हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी
Trending News In Marathi: अमेरिकेतील मिसिसिपी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकाने एका टुरीस्टला त्याचे फोटो व व्हिडिओ पत्नीला पाठवण्याची धमकी दिली आहे.
Trending News In Marathi: प्रेयसीला हॉटेलला घेऊन आलेल्या व्यक्तीला हॉटेल मालकाने चांगलाच दणका दिला आहे. मालकाने त्याचे प्रेयसीसोबतचे सीसीटीव्ही फुटेज थेट पत्नीला पाठवून देण्याची धमकी दिलीआहे. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा रंगली आहे. अमेरिकेतील मिसिसिपी येथील ही घटना आहे. हॉटेलचे रिव्ह्यू खराब दिल्याने मालकाने हे सगळे कृत्य केले आहे. या प्रकरणात व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.
शॉन मॅकी असं या व्यक्तीचे नाव आहे. मिसिसिपी येथील तो रहिवाशी आहे. 2022 मध्ये त्याने एका मित्रांच्या रियुनियनसाठी एक हॉटेल बुक केले होते. 9 ते 11 सप्टेंबर या दिवसांसाठी 3 जणांसाठी हॉटेल बुक केले होते. मात्र आयत्यावेळीच त्यांने त्याच्या आणखी मित्रांना बोलवले. जास्त माणसं आल्याने हॉटेल मालकाने अधिकचे पैसे लावले. मात्र, शॉन मॅकी याने अतिरिक्त पैसे भरण्यास नकार दिला.
मॅकी याने पैसे भरण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मालकाने त्याचे इतर महिलांसोबतचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज त्याच्या पत्नीला ई-मेल करण्याची धमकी दिली आहे. या सर्व घटनेनंतर चिडलेल्या मॅकीने घर मालकाविरोधात कोर्टात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी जेव्हा मॅकी भाड्याने घेतलेल्या घरी आला तेव्हा त्याने पाहुण्यांची यादी घर मालकाला दिली. त्याचवेळी त्याने अन्य काही जणांना रात्रीच्या जेवणासाठी बोलवले. तसंच, हे लोक रात्रीदेखील इथेच राहतील, असे सांगितले. मात्र सुरुवातीला घर मालकाने त्यास नकार दिला. मात्र मॅकीने त्यावर काहीन ऐकता घरातच राहण्याचा व पार्टी करण्याचा निर्णय घेतला.
पार्टी सुरू झाल्यानंतर मॅकी आणि त्याच्या मित्रांनी पार्किंग एरियामध्ये गोंधळ घालत, शिवीगाळ करत असल्याचा दावा घरमालकाने केला. मालकाने ई-मेलमध्ये लिहलं होतं की, मॅकीचे मित्र घराबाहेर तमाशा करत आहेत. यामुळं शेजाऱ्यांना त्रास होत आहे. अनेकांनी मला फोन करुन याबाबत तक्रार केली आहे. त्यामुंळ तुम्ही लगेचच माझे घर सोडून जा, असं ईमेलमध्ये लिहलं आहे.
मात्र, मॅकीने हे सर्व खोटं असल्याचे पल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने म्हटलं आहे की, आम्ही घरात फक्त पाच जणच होतो. तसंच, पार्टीदेखील करत नव्हतो. घरमालकाचे सर्व आरोप मॅकीने फेटाळले आहेत. मी घराचे कोणतेही नियम मोडले नाहीत, असा दावा मॅकीने केला आहे.
दुसऱ्या दिवशी मॅकीने घर सोडल्यानंतर त्याने ऑनलाइन नकारात्मक रिव्ह्यू दिला. तसंच, पैशांचाही रिफंड मागितला होता. मात्र घरमालकाने त्याला रिफंड देण्यास नकार दिला. व निगेटिव्ह रिव्ह्यू दिल्यामुळंही त्याचा संताप झाला होता. त्यामुळं त्याने मॅकीचे इतर महिलांसोबतचे फोटो थेट त्याच्या पत्नीला पाठवण्याची धमकी दिली आहे.