Funny Thief: चोराचा चोरीदरम्यान विचित्र प्रकार! त्या रात्री असं घडलं की तुम्हीही पोट धरून हसाल
Coffee With Thief: सोशल मीडियावर एका चोरीची घटना व्हायरल होत आहे. चोराला पकडल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने ही घटना शेअर केली आहे. विशेष म्हणजे चोराने यावेळी काहीच चोरलं नाही.
Thief In Kitchen Of Home: गुन्हेगारी विश्वात सर्वाधिक घटना या चोरीच्या असतात. आपल्या आसपास चोरीच्या घटना (Theft Incident) घडत असतात. पेपर, न्यूज चॅनेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या घटना कळतात. मात्र काही चोरीच्या घटना वाचल्यानंतर हसू येतं. भारतात तर एका चोरांनं चोरीनंतर दुकानदाराला चीड येईल असं लिहिलं होतं. त्यामुळे असा प्रकार पाहिल्यानंतर हसू आवरता येत नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतून समोर आला आहे. चोर चोरी करण्यासाठी एका घरात गेला खरा पण कॉफी पिऊन झोपी गेला. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडामधील (America Florida) आहे. मीडिया रिपोर्टनुसार चोराचं नाव मर्डोक असून 29 वर्षांचा आहे.
काय घडलं त्या रात्री
घटनेच्या दिवशी मर्डोक चोरी करण्यासाठी एका घरात घुसला. जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा फ्लोअरवर कोणीही नव्हतं. त्यानंतर त्याने बाथरुममध्ये जाऊन आंघोळ केली आणि किचनमध्ये (Thief In Kitchen) कॉफी प्यायला. त्यानंतर त्याचा डोळा आणि तिथेच झोपी गेला. झोप पूर्ण झाल्यानंतर काहीही न चोरता निघून गेला. घराचा मालक आल्यानंतर त्याला चोर घुसल्याचा संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. फ्लोरिडा पोलिसांनी सांगितलं की, चोराने घरात घुसण्यासाठी दरवाजा जवळील काच तोडली होती. त्यानंतर बाथरुमध्ये बाथटब वापरला आणि बेडरुममध्ये जाऊन मस्त झोपी गेला.
वाचा बातमी- Bank Robbery: चोराने बँक लुटण्यासाठी बूक केली कॅब, परत येताना केली अशी चूक आणि...
पोलिसांनी आरोपीला असं पकडलं
पोलिसांनी मालकाच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद केली आणि तपासाची चक्र फिरववली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोराला अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर चोरी आणि मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच चोराने त्या दिवशी काय याची कबुली देखील दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.