मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यात काही खरोखरचं खुप मनोरंज असतात तर काही व्हिडीओ हे आपल्याला माहिती देणारे असातात. सोशल मीडियावर काहीही टाकलं तरी ते लगेचच हजारो लोकांपर्यंत पोहचतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्याला लोकं नुसतं शेअरच करत नाहीत, तर त्यावर कमेंट्स देखील करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ आफ्रिकन तरुणांचा आहे, यात एक आफ्रिकन तरुण बॉलिवुडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे प्रसिद्ध गाणं गात आहेत आणि त्याचे सहकारी त्याला गाण्यात मदत करुव प्रोत्साहन देत आहेत. या तरुणाने धडकन सिनामातील, 'तुम दिल की धडकन मे'मधील गाणं गायले आहे. ज्यावर त्याचे मित्र त्याला ताल धरायला मदत करत आहेत.


या आफ्रिकेतली तरुणाच्या कुमार सानूच्या आवाजाला लोकांकडून पसंती दर्शवली जात आहे. हा व्यक्ती आफ्रिकन असुनही त्याला भारतीय गाण्यांची ओळख असणे ही एक नवलाची गोष्ट आहे, त्याच प्रमाणे ते गाणं या व्यक्तीने कुमार सानू यांच्या आवाजात गायलं, ज्यामुळे लोकांना धक्का बसला आहे.



त्याचमुळे या व्हिडीओला मोठ्याप्रमाणात लोकांकडून पसंती मिळत आहे. तर काही लोकं या तरुणाला आफ्रिकेतली कुमार सानूं या नावाने संबोधत आहेत.