न्यूयॉर्क : काँग्रेसचं आंदोलन हे एनआरआय आंदोलन होतं, तसंच महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल आणि आझाद हे एनआरआय होते, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी एनआरआयना (अनिवासी भारतीया) संबोधित केलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहरू इंग्लंडवरून परतले होते. आंबेडकर, पटेल, आझाद एनआरआय होते. या सगळ्यांकडे बाहेरच्या दुनियेतला अनुभव होता. भारतामध्ये परतल्यावर या सगळ्यांनी देशाचा चेहरा-मोहरा बदलला, असं राहुल गांधी म्हणाले.


एनआरआयनी काँग्रेससोबत काम करावं, असं आवाहनही राहुल गांधींनी यावेळी केलं. एनआरआयना वेगवेगळ्या क्षेत्रातली चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला मदत करावी, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.