LPG Tanker Blast : दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक बातमी समोरआली आहे. आज शनिवारी सकाळी इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन अनेक लोक ठार झाले आणि जखमी झाले.(Gas Tanker Explodes In South Africa) ही घटना बॉक्सबर्ग शहरात घडली. स्फोटानंतर जवळच्या रुग्णालयात आग लागली. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला. इंधन ट्रक एलपी गॅसचा असल्याचे सांगण्यात येत आहे.


गॅस लीक झाल्याने हा स्फोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्सबर्गच्या टॅम्बो मेमरिअल रुग्णालयाजवळ एका एलपीजी टँकरमध्ये (LPG Tanker) भयानक स्फोट झाला.यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. रुग्णालयाजवळच काही अंतरावर भूयारी मार्गातून जाताना टँकरला अपघात झाला. त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस लीक झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा भीषण स्फोट ओआर टॅम्बो मोमोरियल रुग्णालयापासून काही अंतरावर झाला. हा टँकर एलपीजीचा होता. भीषण स्फोटानंतर नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती.


कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी गोंधळाचं वातावरण


स्फोट इतका भयानक होता की रस्त्यावरच्या काही कारही यात बेचिराख झाल्यायत. तर स्फोटानंतरच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी रुग्णालयातही गोंधळाचं वातावरण पाहायला मिळाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अनेकजण गंभीररित्या भाजल्याने रस्त्यावरच ओरडत तर काही जण आक्रोश करीत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


अपघातात अनेक गाड्यांचा समावेश 


प्राथमिक माहितीनुसार, अपघातात अनेक गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, बचावकार्यासाठी आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावकार्य सुरु आहे.  अनेक आपत्कालीन सेवा एजन्सी सध्या Boksburg मधील रेल्वे स्ट्रीटवर उपस्थित आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंधनाच्या टँकरचा स्फोट झाला आहे. अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.