Optical Illuison Viral Photo: ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illuison) चे फोटो व्हायरल होणं, ही काही नवी बबा नाही. म्हणजे सोशल मीडियावर दर दिवशी काही असे फोटो व्हायरल होत असतात जे आपल्या निरिक्षण क्षमतेची परीक्षा घेत वेळोवेळी आव्हानं देत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचीही बुद्धी तल्लख असेल, तर आता नव्यानं फोटो व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये दडलेली गोष्ट शोधून दाखवाच. आता तुम्ही हा फोटो पाहून तुम्ही म्हणाल, हे काय नुसते दगड धोंडे. 


अहं! दगड पाहून गोंधळून जाऊ नका. कारण यामध्ये एक प्राणीही दडला आहे. सहजा खडकाळ प्रदेशांमध्ये किंवा दगडांच्याही खाचांमध्ये काही प्राणी दडलेले असतात. अनेकदा या प्राण्यांचे रंग आणि त्यांची रचना दगडांशीच इतकी मिळतीजुळती असते, की पाहणारेही चक्रावून जातात. 


ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illuison) चा हा नवा फोटो त्याचंच एक उदाहरण. तुम्हाला या दगडांमध्ये दडलेला एक प्राणी शोधायचाय. अगदी व्यवस्थित फोटो पाहा. प्रत्येक कोपराही पाहा. 


फोटोमध्ये तुम्हाला बरोबर मध्यभागी एक प्राणी दिसेल. त्वचेचा पोत काहीसा भिन्न असल्यामुळं हा प्राणी शोधणं सोपं होत आहे. तुम्हाला भेटला का?