Bihari Boy Married To German Girl : देशभरात लग्नसोहळे (Marriage) सुरु आहेत. जागोजागी लग्नाच्या लाईटींग, बँड बाजा वाजतायत, वरात निघतेय, असा सर्व आनंददायी माहोल आहे. या सर्वांत आता जर्मनची तरूणी (german girl) भारताची सुन बनली आहे. या तरूणीने नुकतीच मैथिल रितीरिवाजानुसार (Hindu Culture) तरूणासी लगीनगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.  


अशी झाली भेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या सहरसाच्या पटुआहा गावात राहणारा चैतन्य झा (chaitanya jha) हा जर्मनीत शिकायला गेला होता.त्याचे सुरूवातीचे शिक्षण भारतात झाले होते. मात्र पुढील शिक्षणासाठी तो जर्मनीत शिकायला गेला होता. यावेळी तेथील कॉलेजमध्ये पीएचडी करत असताना त्याची मार्था (martha) हिच्याशी झाली. मार्था देखील पीएचडी करत होती. येथे शिकत असताना दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


मार्थाने (martha) चैतन्यसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी दोघांनी आपआपल्या कुटुंबियांशी बोलणी केली. आणि कुटूंबियांनी देखील त्याच्या नात्याला हिरवा कंदील देत लग्नाची परवानगी दिली.  


जर्मनी ते थेट बिहार 


मार्था (martha) पोलंडची रहिवासी ऑर्लोस्का यांची मुलगी आहे. लग्नासाठी ती जर्मनीहून तिच्या कुटूंब आणि नातेवाईकांसह भारतात आली होती. बिहारच्या सहरसा येथे तिचे मैथिल रितीरिवाजानुसार (Hindu Culture) लग्न पार पडले. मार्थाकडून (martha) लग्नासाठी तिची आई, बहीण आणि एक नातेवाईकही बिहारला पोहोचले होते. या लग्नाची गावात एकच चर्चा रंगली होती. 


मार्थाला (martha) हिंदी कसे बोलावे ते कळत नाही, तरीही मिथिलाने रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास होकार दिला. आणि इथल्या परंपरेनुसार लग्न केलं. चैतन्यच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मार्थाने दोन-तीन महिन्यांत हिंदी शिकणार असल्याचे सांगितले आहे.लग्नाच्या वेळी वधूने दोन-तीन महिन्यांत हिंदी शिकेन, असे वचन दिले होते. 


दरम्यान या लग्नाची (Marriage story) चर्चा संपुर्ण बिहारभर पसरली आहे. या लग्नाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.