सुमात्रा : जगभरात कुठे काय अजब गजब प्रकार घडेल याचा काही नेम नाही. इंडोनेशियात एका 'महाशयाची' अजगर मारून खाण्यापर्यंत मजल गेली. हा साधासुधा नाही तर तब्बल २६ फुटाचा हा अजगर होता. गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी त्याने अजगराशी दोन हात केल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इंडोनेशियातील सुमात्राच्या बतांग गनसाल जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. उष्णतेच्या दिवसात पाण्याच्या शोधात अनेक प्राणी आपले ठिकाण सोडून बाहेर पडतात. तसेच याठिकाणी पामची शेती असून उंदरांचाही फार सुळसुळाट आहे. त्यामूळे इथे अजगर येण्याची वेळ काही पहिलीच नाही.२६ फुटी अजगर दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले


.


त्यानंतर ३७ वर्षाच्या रॉबर्ट नबाबन या सुरक्षा रक्षकाने अजगराशी सामना केला. त्यात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. पण तरी त्याने अजगराचे दोन दात उचकटले. त्यानंतर  एका झाडावर अजगराला टांगून ठेवले होते. नंतर ग्रामस्थांनी भाजून आणि तळून अजगरावर यथेच्छ ताव मारला.