Viral News: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी वन्य प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. त्यांची शिकाराची पद्धत पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट स्नेक कॅचर्स 24/7 कंपनीत काम करणार्‍या स्टुअर्ट मॅकेन्झी यांनी सापांची छायाचित्रे सोशल मीडियावर फेसबुक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छायाचित्रांमध्ये एक अजगर छतावर लटकलेला दिसत आहे. अजगर पोपटाला गिळत असल्याचं दिसत आहे. पोपटाचे फक्त पंख दिसत आहेत. पोपटाला हलण्याची संधी देखील दिली नाही. फोटो शेअर करणाऱ्या स्टुअर्ट मॅकेन्झीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'निसर्ग एकाच वेळी अविश्वसनीय आणि क्रूर असू शकतो! अजगर सुंदर पक्षी पकडू शकतात आणि त्यांना गिळू शकतात, परंतु लक्षात ठेवा की, अजगर आपल्या वातावरणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात, कृपया त्यांना योग्य तो सन्मान द्या.'



हे फोटो शेअर केल्यानंतर व्हायरल झाले आहेत. या फोटोंना आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'निसर्ग सर्वोत्तम आहे.' दुसरा युजर्सने लिहिलं आहे की,  'मला वाटत नाही की, अजगराला गिळणं सोपी गोष्ट नाही.'