माउंट एव्हरेस्ट नाही तर समुद्राखाली दडलाय पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत; बुर्ज खलिफा ठेंगणा दिसेल
आकाशाचे टोक आणि समुद्राचा तळ कुणुही गाठू शकलेले नाही. ज्याप्रमाणे अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे त्याच प्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील अनेक रहस्य दडलेली आहेत. संशोधक या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनदरम्यान संशोधकांनी समुद्राखाली सर्वात उंच पर्वत शोधला आहे.
Giant Seamount Discovered In Pacific ocean : माउंट एव्हरेस्ट पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत आहे. माउंट एव्हरेस्ट नाही तर समुद्राखाली दडलेला आहे. पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत. प्रशांत महासागराखाली महाकाय पर्वत सापडला आहे. हा महाकाय पर्वत जगातील सर्वाच उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षाची उंच असल्याचा दावा संशोधक करत आहेत.
समुद्रसपाटीपासून 13,100 फूट खोलीवर आहे हा अवाढव्य पर्वत
संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी प्रशांत महासागरात एका विशाल सागरी पर्वत शोधला आहे. हा पर्वत समुद्रसपाटीपासून 5249 फूट उंच आहे. जगातील सर्वा उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीच्या जवळपास दुप्पट उंच हा सागरी पर्वत आहे. या पर्वताला सीमाउंट असे म्हणतात. या अवाढव्य सीमाउंट समुद्रात 7,900 फूट खोलीवर आहे. समुद्रसपाटीपासून हा सुमारे 13,100 फूट खाली आहे. श्मिट ओशन इन्स्टिट्यूट (SOI) यांच्या टीमने एका सागरी मोहिमेदरम्यान या सीमाउंटचा शोध लावला आहे. हा पर्वत म्हणजे हा नामशेष झालेला ज्वालामुखी आहे.
कुठे सापडला हा समुद्री पर्वत?
प्रशांत महासागरात ग्वाटेमालाच्या समुद्र किनाऱ्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रापासून सुमारे 135 किमी अंतरावर संशोधकांनी हा पर्वत शोधला आहे. या पर्वताची लोकेशन पॅसिफिक महासागरात ग्वाटेमालाच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 156 किलोमीटर अंतरावर आहे. मल्टीबीम सोनार मॅपिंगच्या मदतीने या पर्वताचा शोध घेण्यात आला. पर्वतापर्यंत पोहचण्यासाठी सहा दिवस लागले शास्त्रज्ञांनी कोस्टा रिका ते ईस्ट पॅसिफिक राइस असा सागरी प्रवास केला. हे ठिकाण जेथे आहे तेथे सहा टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. येथे पॅसिफिक टेक्टोनिक प्लेटचा पश्चिम भाग आणि उत्तर अमेरिकन प्लेटचा ईशान्य भाग देखील आढळतो.
खोल समुद्रात असे लाखो सीमाउंट असण्याची शक्यता
US National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) ने सीमाउंटला उंच उतार असलेला पर्वत म्हणून परिभाषित केले आहे. सीमाउंट हे बहुतेकदा शंकूच्या आकाराचे असतात. प्राचीन ज्वालामुखीपासून हे तयार झालेले असतता. संपूर्ण पृथ्वीवरील महासागरांमध्ये अशा प्रकारच्या अनेक समुद्री भूवैज्ञानिक रचना आहेत. यामुळे खोल समुद्रात असे लाखो सीमाउंट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी फक्त काही सीमाउंट शोधण्यात संशोधकांना यश आले आहे.
सीमाउंटच्या खाली असू शकतात असंख्य समुद्री जीव
फाल्कोर या जहाजाच्या मदतीने हा सीमाउंट शोधण्यात आला. या जहाजावर EM 124 मल्टीबीम इको साउंडर बसवण्यात आले आहे. याचा वापर हा सीमाउंट शोधण्यासाठी करण्यात आला. या उपकरणाचा वापर करून, समुद्राच्या तळाचे उच्च रिझोल्यूशन मॅपिंग करण्यात आले. हा पर्वत पाच चौरस मैलांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे. एसओआयचे कार्यकारी संचालक ज्योतिका विरमानी यांनी याबाबत माहिती दिली. 'समुद्राखाली 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीचा पर्वत सापडला आहे. हा पवर्त लाटांच्या खाली लपलेला होता. सीमाउंट हे जैवविविधतेसाठी हॉटस्पॉट आहेत. विविध प्रकारचे क्रस्टेशियन्स, स्पंज आणि कोरल यांच्या सारखे जीव येथे असू शकतात.