Girl Caught Cheater Boyfriend: बऱ्याच लोकांना आपल्या आयुष्याच्या संबधित घटना किंवा त्यांचे संकेत स्वप्नात कळतात. असंच काहीसं एका मुलीबाबत घडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सन'च्या रिपोर्टनुसार, टिकटॉक यूजर जेमी नावाच्या मुलीने  सांगितले की, तिला रात्री असे स्वप्न पडले की त्याचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत रात्र घालवतोय आहे. या स्वप्नानंतर तिची अस्वस्थता इतकी वाढली की ती तत्काळ त्याच रात्री प्रियकराच्या घरी पोहोचली.


प्रियकराच्या घरी गेल्यावर तिला धक्का बसला. जेमीने सांगितले की, जेव्हा ती प्रियकराच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तो दुसऱ्या मुलीसोबत होता.


ही तिची फसवणूक होती. ती तिचा बॉयफ्रेंडसोबत खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती.  परंतू हे पाहिल्यानंतर तिची पाया खालची जमीन सरकली.


गेल्या काही दिवसांपासून जेमीला तिचा प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात होते. काही दिवसांपासून तिला विचित्र स्वप्नही पडत होते. प्रियकर सोबत असूनही तो तिच्यापासून दूर गेल्यासारखे तिला वाटत होते.


परंतू तिला पडलेले स्वप्न खरे ठरले, तिने दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला तेव्हा प्रियकर दुसऱ्या मुलीला चिकटून झोपला होता.


जेमीने फोटो घेतला आणि निघून गेली. त्यानंतर प्रियकराला फोटो पाठवून थेट ब्रेकअप केले.