मुलीने ऑनलाईन जेवण ऑर्डर करताच ४२ डिलीव्हरी बॉय पोहोचले घरी
दृश्य पाहून आजू-बाजूचे देखील हैराण झाले.
नवी दिल्ली : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला. पण आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान अनलॉकच्या माध्यमातून सर्व हॉलेट्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेलमध्ये न जाता नागरिक आता ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यावर भर देत आहेत.
ऑनलाईन ऑर्डर करताच काही मिनिटांमध्ये जेवण घरी येतं. पण फिलिपीन्समध्ये सर्वांना चकीत करणारी घटना घडली आहे. एका मुलीने ऑनलाईन जेवण ऑर्डर करताच ४२ डिलीव्हरी बॉय तिच्या घरी पोहोचले. हे दृश्य पाहून आजू-बाजूचे देखील हैराण झाले.
काहींनी संबंधित दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. तर काहींनी हा सर्व प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला. सध्या सोशल मीडियावर ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. महत्त्वाचं म्हणजे ४२ डिलीव्हरी बॉय एकत्र दारात पाहून मुलगी मोठ्या गोंधळात सापडली.
सर्वांना चकित करणारा हा प्रकार ऍपमधील तांत्रिक बिघाडामुळे उद्भवला. त्यामुळे ४२ डिलीव्हरी बॉय यांना एकच ऑर्डर मिळाली. सोशल मीडियावर मात्र ही घटना वाऱ्यासारखी पसरत आहे.