Trending Video : घरात लहान मुलं असेल तर आपल्याला प्रत्येक पाऊलावर सतर्क राहावं लागतं. आपली छोटीशी चूक त्यांच्या जीवावर बेतल याचा नेम नाही. घरातील प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने ठेवावी लागतात. कारण जर घातक आणि लहान मुलांचं नुकसान करणाऱ्या वस्तू त्यांच्या हातात लागली तर त्यातून वाईट घटना घडू शकते. लहान मुलांना त्यांच्या जीवाची पर्वा नसते. मुळातच त्यांना जीव आणि धोका या शब्दांचा अर्थ कळत नसतो. त्यामुळे ते नकळत स्वतःचा जीव धोक्यात घालतात. (girl shoots herself with gun florida video viral Social media trending today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 3 वर्षाच्या चिमुकलीने खेळताना बंदूक उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 


हा व्हिडीओ पाहून पालकांवर संताप येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातील सोफ्यावर एक बंदूक दिसत आहे आणि तिथे आजूबाजूला एक चिमुकली खेळताना दिसत आहे. तर एक व्यक्ती लॅपटॉपवर व्यस्त आहे. ती मुलगी सोफ्याजवळ जाते आणि बंदूक हातात घेतात. तिने हातात बंदूक घेतल्यावर एक गोळी झाडते. त्यानंतर मुलगी आरडाओरडा करते. गोळीचा आवाज ऐकताच तो व्यक्ती त्याच्या हातून बंदूक घेण्याचा प्रयत्न करतो. गोळीचा आवाज ऐकताच तिथे अजून एक लहान मुलगा येतो आणि तो कानावर हात ठेवून कावराबावरा झालेला दिसतो. घरातील इतर मंडळीही धावत येतात, त्याशिवाय घरात तीन श्वानही असतात. तेही घाबरून इकडेतिकडे पळायला लागतात. सर्व जण मुलीच्या मदतीला धावतात. 


चिमुकलीला निक्लॉस चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना फ्लोरिडामधील आहे. हा व्हिडीओ मुलीची आजी रॉबिन फुलर यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  द सनच्या रिपोर्टनुसार, मुलीच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती तिचा नातेवाईक होता. तिचं नाव ओरलँडो असून त्याला अटक करण्यात आली आहे. बंदूक निष्काळजीपणे वापरल्याचा आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 



ओरलँडो पोलिसांना सांगितलं की, त्याने काही काळासाठी बंदूक सोफ्यावर ठेवली होती. ती चिमुकली स्वत:ला शूट करेल याची त्याला कल्पना नव्हती. दरम्यान याच्या या निष्काळजीपणामुळे अजून गंभीर परिणाम झाला असता, अशी भीती सेरेनिटीच्या आजीने व्यक्ती केली आहे. सुदैवाने ती चिमुकली जिवंत आहे.