Trending Girl Viral Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात.  पण त्यातील काही व्हिडीओ असं असतात जे यूजर्सचं लक्ष वेधून घेतात. काही व्हिडीओ तर हे इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. हे व्हिडीओ अगदी गुगलवर ट्रेंडिंगमध्ये असतात. एका तरुणीचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. या व्हिडीओमधील तरुणीचा स्वॅग बघून यूजर्सने व्वा व्वा केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण म्हणत आहेत. मुलींशी पंगा घेतं हे कायम भारी पडतं. या व्हिडीओमधील दोन तरुणांनाही तरुणीशी पंगा घेणं महागात पडलं आहे. 


तरुणीचा स्वॅगचं वेगळा!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रात्री उशिरा अंधारातून सुन्नसान रस्त्यावरून ती तरुणी जात होती. तिच्या हातात मोठी अशी पिंक रंगाची पर्स होती. रस्त्यावर कोणी नव्हतं, तरी ती बिनधास्त चालत जात होती. तेवढ्यात मागून बाइकवर दोन तरुण आले आणि त्याचा जवळ येऊन थांबले. त्या तरुणींनी बाईकवरुन उतरुन तरुणीवर हल्ला केला आणि तिची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्यांच्याशी दोन हात करत ती पर्स दूर फेकून दिली. ते दोन तरुणी पर्स उचलायला गेले अन् मग...


कहाणी में ट्विस्ट है! 


या व्हिडीओमध्ये पुढे जे घडलं याची तुम्ही आम्ही काय कोणीही कल्पना करु शकणार नाही. त्या तरुणीने चोरांना पर्स घेण्यासाठी पळवलं आणि ती स्वत: त्या तरुणांची बाईक घेऊन पसार झाली. हो अगदी बरोबर. तरुणीला लुटण्यासाठी आलेले चोर स्वत:चा चोरीचे शिकार झाले होते. गंमत म्हणजे त्यांनी चोरलेली पर्सदेखील ठणठणीत रिकामी होती. आता या रिकाम्या पर्ससोबत ते दोघे एकमेकांना शिव्या घालत जात होते. त्यांच्या ध्यानी मनी पण आलं नसणार पुढे त्यांचा सोबत काय होणार आहे ते. (Girl thief Instagram Video Viral on Internet Trending video google trend today)


अन् तरुणीने...


पर्स हा मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मग ही तरुणी आपली पिंक रंगाची इतकी सुंदर पर्स चोरांना कधी घेऊ देईल. तरुणी चोरांकडून चोरलेल्या बाईकवरुन पुन्हा त्याच रस्त्याने मागच्या बाजूने येते आणि त्या तरुणाकडून तिची पर्स घेऊन बाईकवरुन सुसाट चालवत तिथून निघून जाते. 


हेसुद्धा वाचा - Father's Day Special : मुलीला न्याय देण्यासाठी 35 वर्षे लढणाऱ्या बापाची 'अधुरी कहाणी', वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओ व्हायरल 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील investingterm या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. अनेक यूजर्स म्हणत आहेत की, हा व्हिडीओ पाहून त्यांना हसू आवरत नाही आहे.