ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरम GMBF ही आखाती देशातील महाराष्ट्रीयन व्यवसायाच्या प्रमोशनसाठी काम करणारी एकमेव संस्था आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांचा इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट यांचा व्यवसाय वाढावा, याचबरोबर महाराष्ट्रीयन उत्पादकांना दुबई आणि आखाती देशातील विविध व्यावसायिक संस्थांमार्फत बरोबर आदान प्रदान करता यावे या उद्देशाने ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरम GMBF गेल्या पंधरा वर्षापासून काम करतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरमचा GMBF एक महत्त्वाचा उपक्रम आहे महाबीज कॉन्फरन्स आतापर्यंत पाच यशस्वी परिषदांचे आयोजन या संस्थेने केलं आहे. महाबीजची सहावी परिषद, हॉटेल अटलांटिस पाम बीच दुबईमध्ये 24 व 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे


महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे, याचा विचार करून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर- MACCIAने ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरम- GMBF बरोबर एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. ज्या अनुयोगाने महाराष्ट्र चेंबरचे व्यावसायिक व्यापारी कारखानदार ट्रेडर्स आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योजक दुबईतील कॉन्फरन्सला उपस्थित राहू शकतात 


या कॉन्फरन्सला एकत्रितरित्या सुमारे 700 ते 800 उद्योजक भारतातून येऊ शकतात. तर आखातातील बहारीन सौदी अरेबिया मस्कत अशा विविध देशातून सुमारे दीडशे ते दोनशे प्रतिनिधी अपेक्षित आहेत.


फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये आखात आणि भारत अशा दोन्ही विभागातील विविध उद्योजकांचे एकमेकात आदान प्रदान केले जाते. यामुळे निश्चितपणे सर्वांचेच व्यवसाय वाढू शकणार आहेत.


GMBF तर्फे आयोजित केल्या गेलेल्या, अशा पाच कॉन्फरन्स मध्ये अनेक उद्योजकांनी दुबईत आणि दुबईतून सुरू करून युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये आपला व्यवसाय विस्तार केला आहे. तसेच विविध तंत्रज्ञान इम्पोर्टद्वारे अंगीकारून आपल्या व्यवसायामध्ये प्रगती केली आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष माननीय ललितजी गांधी यांनी केले आहे. 


ग्लोबल महाराष्ट्र बिजनेस फोरम अर्थात GMBF आणि महाबीज परिषद याविषयीची माहिती GMBF चे अध्यक्ष, डॉक्टर सुनील मांजरेकर यांनी दिली. महाराष्ट्र चेंबरचे महाराष्ट्रभरातील प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 
तसेच GMBF चे विवेक कोलटकर ,दिलीप खेडेकर, डॉक्टर मापारा आणि नितीन सस्तेकर उपस्थित होते. मुंबईमध्ये झालेल्या या सोहळ्याच्या प्रसंगी असलेल्या सर्व उद्योजकांनी या कॉन्फरन्सला येण्याची तयारी दाखवलेली आहे.