बीजिंग : चीनपासून (China) सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने (CoronaVirus) जगभरात थैमान घातले आहे. व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे आहे. भारतातही आतापर्यंत ही संख्या वाढत आहे. लागण झालेल्यांची संख्या ४० च्या घरात पोहोचली आहे. चीनमध्ये आणखी १७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४००० लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत वृत्तसंस्था एएफपीच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या संख्या चीनमध्ये सर्वात जास्त असून तेथे ४००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर त्याखालोखाल इटली हा देश आहे. इराणमध्येही २०० हून अधिक मृत्यू झाले असून दक्षिण कोरीयात ७ हजारांहून अधिकांना लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परदेशातून भारताय आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. 



जगभरात ९० पेक्षा जास्त देशांत सुमारे १ लाख १० हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. यापैकी एकट्या चीनमध्ये ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे जगभरात ४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालीची नोंद आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून ४० च्या घरात पोहोचली आहे. चीनमागोमाग आता इटलीतही कोरोनाचा संसर्ग बळावत आहे. इटली या देशात कोरोनाने थैमान घातले असून सोमवारी एका दिवसात १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो देश तर इराणमध्येही मृत्यूंचा आकडा वाढत आहे.


इटलीमधील सरकारने आणीबाणीची घोषणा केली आहे. संपूर्ण देशातील व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर असून लोकांना घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जगातील शेअर बाजावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.


भारतातही सोमवारी शेअर बाजाराची दाणादाण उडाली आहे. तर अमेरिकेतही शेअर बाजारात मोठी घरसरण दिसून येत आहे. भारतात एका दिवसात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये  १९४१.६७ अंकांची घसरण झाली. २००८ पासूनची ही एका दिवसाअखेरीची सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे किमान ५ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.