मुंबई : सिएटलच्या महापौर जेनी दुर्कन यांनी 'सिएटलला सैन्य पाठविणे असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे',असे अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटकरून म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर, 'तुमच्या बंकरमध्ये परत जा. जर तुम्ही तसे केले नाही तर मी करेन', असं प्रत्युत्तर देखील सिएटलच्या महापौर जेन्नी दु्र्कन यांनी ट्रम्प यांना दिलं आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी सिएटलच्या निषेधांवरून हस्तक्षेप करण्याची धमकी दिल्यानंतर महापौर जेनी दुर्कन यांनी ट्रम्प यांना 'आम्हाला सुरक्षित ठेवा. आणि तुम्ही तुमच्या बंकरकडे परत जा' असे सांगितले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या हिंसक प्रदर्शनाला रोखण्यासाठी अमेरिकेच्या सेनेचा वापर करण्यात आला. यावर सिएटलच्या महापौर जेनी दुर्कर यांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधान नॅशनल गार्डचा वापर करण्यावर आक्षेप घेतला आहे. जॉर्ज फ्लोयड यांच्या मृत्यूबद्दल शहरात जातीयवादविरोधी निदर्शने सुरू झाल्यानंतर निदर्शकांनी गुरुवारी "कॅपिटल हिल ऑटोनॉमस झोन" सुरू केली होती. अहवालानुसार सहा ब्लॉक असलेल्या स्वायत्त झोनमध्ये अक्षरशः पोलिसांची उपस्थिती नाही. पोलिसांना बदनाम करण्याचे आवाहन करत आंदोलकांनी सिटी हॉलमध्येही धडक दिली होती.





ट्रम्प यांनी महापौर जेनी दुर्कन आणि राज्यपाल जे इन्सली यांना ट्विटमध्ये असा इशारा दिला होता की निदर्शक सिएटलचा ताबा घेणारे "देशांतर्गत दहशतवादी" होते. "हा खेळ नाही. या कुरुप अराजकवाद्यांनी त्वरित हडप केले पाहिजे, वेगवान हालचाल करावी," अमेरिकेच्या अध्यक्षांनी सिएटलच्या दोन डेमॉक्रॅटिक नेत्यांना सांगितले.