बॉससोबत डेटला जाऊन मिळवा नोकरी आणि ६७ लाख पगार
बॉससोबत डेटला जाऊन मिळवा नोकरी आणि ६७ लाख पगार..
मुंबई : बॉससोबत डेटला जाऊन मिळवा नोकरी आणि ६७ लाख पगार... ऐकायला थोड विचित्र वाटेल..तुम्ही म्हणाल काय बातम्या देता राव? असं कुठं असतंय व्हयं ? काहीही सांगू नका..वगैरे..वगैरे पण हे खरं आहे. अशी पण एक कंपनी आहे जी उमेदवारांना 'बॉससोबत डेटला जा' म्हणते. उमेदवारातील गुण आणि पात्रता यामुळे कळते असे कंपनीचे म्हणणे आहे. हिन्ज असं या कंपनीचं नाव आहे. नातं ज्याला चांगल समजतं आणि ज्याचं संवाद कौशल्य चांगल आहे अशा उमेदवारांची गरज असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे गुण कळायचे असतील तर डेटवर जाण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात येतंय.
किती पगार ?
या कामासाठी निवडलेल्या उमेदवारास कंपनी $८०,००० ते $ १००००० म्हणजेच ६७ लाख रुपये पगार देणार आहे. पगाराव्यतिरिक्त कंपनी कर्मचाऱ्यांस रेस्टोरंट आणि बारचा खर्चदेखील देणार आहे. हा..आता जर तुम्ही असा विचार करत असाल की बॉस सोबत जाऊन लगेच नोकरी मिळते..हे तर सोप्प आहे..तर जरा थांबा...निव्वळ असं नाहीए..एवढंपण सोप्प नाहीए ते...
पात्रता
या जॉबसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवाराकडे सोशियोलॉजीची नोकरी असणं गरजेचं आहे. जर ही डिग्री नसेल तर प्रेम, सेक्स, रिलेशनशिप अशा टॉपिकमध्ये रिसर्च डिग्री असणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर उमेदवारास मीडिया इंडस्ट्रीतील अनुभव असणं गरजेचं आहे.
रिलेशनशीप एक्सपर्ट
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आम्ही जरा दमदार काम करतो. बोलण्यापेक्षा आम्ही करण्यावर जास्त भर देतो असे हिंज कम्यूनिकेशन डायरेक्टर जीन मैरी मॅग्राथ सांगतात. ही नोकरी अॅण्टी रिटेंशन स्पेशालिस्ट या पोस्टसाठी आहे जी पोस्ट रिलेशनशीप एक्सपर्टसारखी असते.