कैलिफोर्निया : गुगल सीईओ सुंदर पिचाई यांना संपूर्ण जगभरात त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. पिचाई यांचे शिक्षण चेन्नई या ठिकाणी झाले. पिचाई यांनी त्यांचे खास अनुभव त्यांच्या मुलाखतीत सांगितले. पिचाई सांगतात की, त्यांच्या कुटुंबाला फोन कनेक्शनसाठी पाच वर्ष वाट बघावी लागली होती. त्यावेळी फोन फार कमी असत. तेव्हा कम्प्यूटर आणि इंटरनेट या गोष्टी तर फारच लांबच्या होत्या. त्यांच्याकडे जेव्हा फोनचे कनेक्शन आले तेव्हा त्यांच्या घराजवळचे अनेक मुले त्यांच्या घरी फोन करण्यासाठी येत असत. ते फोन कनेक्शन एकप्रकारे सामुहिक फोन कनेक्शन झाले होते. त्यावेळी मला तंत्रज्ञानाची ताकद काय असू शकते, याचा अंदाज आल्याचे पिचाई यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलचा सीईओपदी विराजमान होणे, ही माझ्या जीवनातील मोठी संधी होती. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी मला जेव्हा गुगलच्या सीईओपदाची ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला होता, असे पिचाई यांनी सांगितले.


यावेळी पिचाई यांनी तंत्रज्ञान क्षेत्राची भविष्यातील वाटचाल कशी असेल, यावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आजवर तंत्रज्ञान क्षेत्रात स्थलांतरित असलेल्या व्यक्तींनी मोठ्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि संशोधक स्वत:कडे आकृष्ट करण्याच्या कसोटीवर तुमच्या नेतृत्त्वाचे मूल्यमापन होते. यामध्ये सातत्य असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रात गोपनीयता आणि लिंगभेद यासारख्या गोष्टींवरून समस्या निर्माण होतील, असे भाकीतही पिचाई यांनी वर्तविले.