Google employees news: जगातील दिग्गज टेक कंपनी गूगलमध्ये महिलांच्या सुरक्षितेतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जवळपास 500 जणांच्या स्टाफने अल्फाबेट आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना खुले पत्र लिहले आहे.  त्यात महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्यांना कंपनीने संरक्षण देणे बंद करावे, कंपनीतील कामाचे वातावरण अशांत करण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 आयएएनएसच्या वृत्तानुसार गूगलमध्ये काम केलेल्या एमी नेटफील्ड या महिलेने द न्यूयॉर्क टाईम्समध्ये लेख लिहला आहे.  त्यात त्या म्हणतात की, त्यांना अशा व्यक्तीसोबत पुन्हा पुन्हा बैठका घेण्यास भाग पाडण्यात येत होते की, जो तीला कामाच्या वेळी नेहमी छळत होते. 
 


तक्रारीनंतर प्रकरण वाढले


एमी यांनी द न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहलेल्या लेखानुसार मला त्रास देणारा व्यक्ती माझ्या जवळ बसतो. मॅनेजर आणि एचआरच्या म्हणण्यानुसार त्याचा डेस्क बदलण्यात येणार नाही. या परिस्थितीत तुम्ही घरून काम करा किंवा, सुट्यांवर जा असे सांगण्यात आले. एमीने आवाज उठवल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले.


अल्फाबेटासारख्या कंपनीत त्रास देणाऱ्यांवर कारवाई ऐवजी त्यांचे संरक्षण केले जात असल्याचा आवाज उठवला जात आहे.


कर्मचाऱ्यांचे आरोप


 एखाद्या चुकीच्या गोष्टीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला ते सहन करण्यासाठी मजबूर केले जात आहे. बहुतांष वेळा त्रास सहण करणारी व्यक्ती ऑफिस सोडून देते. परंतु त्रास देणारी व्यक्ती तेथेच राहते. परंतु त्याच्या बेजबाबदार कामांचा सन्मान केला जातो. असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.


व्यवस्थापनावर नाराजी


 सुंदर पिचाई यांना लिहलेल्या लेटरमध्ये म्हटले आहे की, 20000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी महिलांना छळल्याच्या तक्रारी करूनही अल्फाबेटने संबधितांवर कारवाई केलेली नाही. कंपनी आपले नियम पाळण्यास असमर्थ ठरली आहे.  
 
 अल्फाबेटमध्ये कर्मचारी अशा वातावरणात काम करू इच्छितात की, ज्या ठिकाणी कर्मचारी / महिला कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही. अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे.