VIDEO : शिकार करायला आला अन् स्वत:च...; आत्मसंरक्षणासाठी लहानशा किड्यानं सरड्याला बोचकरलं
Viral Video : प्राण्यांच्या दुनियेत डोकावून पाहत असताना अनेकदा आपण भारावून जातो. कारण हे इवलेसे जीवही त्यांच्या संरक्षणासाठी बरेच प्रयत्न करताना दिसतात. हा व्हिडीओ तसाच एक...
Viral Video : प्राण्यांचं विश्व कायमच भारावणारं असतं. मुळात आपण, एक मनुष्य म्हणून जगत असताना आपल्या अवतीभोवतीही जीवसृष्टीतील असे काही घटक वावरत असतात जेव्हा त्यांना जवळून न्यायाहळ्याची वेळ येते तेव्हा आपण नि:शब्द होऊन जातो. म्हणूनच की काय हल्लीच्या दिवसांमध्ये पर्यटन, छायाचित्रण या आणि अशा क्षेत्रांमध्येही निसर्गाच्या जवळ कसं जाता येईल हीच बाब प्राधान्यस्थानी ठेवली जाते. अशा या निसर्गानं प्रत्येक जीवाला एक शिकवण दिली आहे. ती शिकवण म्हणजे आत्मसंरक्षणाची.
इवलीशी मुंगीही स्वत:चा जीव वाचवण्यासाठी समोरच्याला इजा पोहोचवते, हे जाणूनच किती कमाल वाटतं ना. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं, सरपटणारे प्राणी, किडे, किटतांचं विश्व जवळून पाहता येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शेकडो व्हिडीओंपैकी हा व्हिडीओ जास्तच खास आहे. कारण.... कारण तुम्हाला व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल.
आतापर्यंत 1.3 मिलियन व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळालेला हा व्हिडीओ एखाद्या माहितीपट किंवा एखाद्या तत्सम कार्यक्रमाचा असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. सरडा रंग बदलतो, हे तुम्ही ऐकलं असेल इथं तुम्हाला ते पाहता येत आहे. फक्त प्रसंग आणि परिस्थिती वेगळी आहे. कारण, इथं सरडा शिकार करायला आलेला असतानाच त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं हादरल्याचं कळत आहे.
हेसुद्धा वाचा : Physical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर
इवलासा नाकतोडा सरड्यावर कसा भारी पडला हे अवघ्या 28 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. एका फांदीवर असणाऱ्या नाकतोड्याला पाहून तिथं सरडा येतो आणि आ वासून नाकतोड्याला गिळण्यासाठी पुढे सरसावतो तितक्यातच दोन्ही हातांनी त्याच्या जबड्यावर पकड धरत नाकतोडाच त्याच्यावर उलट वार करतो. सरड्याला एकटक पाहतो आणि त्याच्या जबड्यावर वार करतो. शेवटी तो सरडा कसाबसा नाकतोड्याची पकड सोडवतो.
सरडा आकारानं मोठा असला म्हणून काय झालं, त्याच्यापुढं नाकतोड्याची रणनिती, समयसूचकता आणि नाही म्हटलं तरी त्याचा आत्मविश्वास दाद द्यायलाच हवी नाहीका? सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा एक व्हिडीओ म्हणजे प्राणीजगताला जवळून पाहण्याची मिळालेली एक संधीच आहे. तुम्ही असा कोणता भन्नाट व्हिडीओ पाहिलाय का?