Groom Bride Viral Video: ज्या विश्वासावर आपण एकमेकांशी लग्न करतो. जीवनभराचे साथदार होतो. सुखदु:खात आपण एकमेकांच्या पाठीशी उभे असतो. अशाच नव्या नात्याची सुरुवात करतानाच त्याला तडा गेला. जिच्यावर प्रेम केलं, ज्याचासोबत संसाराची स्वप्न रंगवली तिचा हा विश्वासघात पाहून नवरदेवाला धक्का बसला आहे...(Extra Marital Affair Viral Video) लग्न म्हटलं की मानपान, जेवणावरुन पाहुण्यामध्ये वाद होतात. असे अनेक प्रकरण आपण पाहिले आहेत. लग्न आणि वरवधूचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. लग्नाचे विधी सुरु असताना एक वधू झोपली होती त्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप बघितला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी लग्नमंडपात मद्यपान करुन आलेल्या नवरदेव चक्क विधी करता करता झोपी गेला. हे पाहून नवरीने लग्न मोडले. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. शिवाय वधू वराचे रोमान्सचेही अनेक व्हिडीओ इंटरनेटवर आहेत. पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं. विश्वास ठेवून आयुष्याची नवीन सुरुवात करतो त्याच व्यक्तीचं आपल्यावर नाही तर दुसऱ्यावर प्रेम आहे हे कळल्यावर माणूस उद्धवस्त होतो. 


त्या नवरदेवानेही नवरीचं हे गुपित अख्खा लग्नात (marriage viral video) सगळ्यासमोर उघडलं केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीसाठी सगळे पाहुणे एकत्र आली होती. नवरदेव आणि नवरी छान तयार होऊन स्टेजवर एन्ट्री घेतात. वऱ्हाडी आनंदाने वधूवरांचं स्वागत करता. वधू वर जेव्हा येतात तेव्हा पाहुणे टाळ्या वाजवतात. (Groom Bride marriage Bride love affair with brother in law during reception party video viral on Social media trending now)


थोड्याच वेळात वधूच्या प्रियकरासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ प्रोजेक्टरवर सुरु केला. ज्या विश्वासाने नात्याला सुरुवात केली असते. त्या नात्याला काही वेळातच तडा जातो. विश्वास एका सेकंदात तुटतो. या सोहळ्यातील नाट्यमय वळणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  या व्हिडीओनंतर पाहुण्याना धक्का बसतो. हा व्हिडीओ पाहून नवरी नवरदेवाला हातातील बुके फेकून मारते. नवरदेवही तिच्या अंगावर धावून जातो. ते पाहून दोन्ही कडील मंडळी नवरी आणि नवरदेवाला सोडण्यासाठी स्टेजवर धावतात. 


सगळ्या धक्कादायक हे आहे की, नव्याने सुरु होणारा संसार काही सेकंदात उद्धवस्त झाला. पण जेव्हा वधूचा प्रायव्हेट व्हिडीओमधील प्रियकर कोण आहे ते कळल्यावर सगळेच अवाक् झाले आणि त्यांचा कुटुंबातील अजून एका व्यक्तीचा संसार तुटला. वधू प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या बहिणीचा नवरा होता. हे पाहून गर्भवती असलेल्या बहिण्याचा आयुष्यात भूकंप आला. त्या एका व्हिडीओने दोन्ही बहीणचं नातं आणि संसाराला तोडा गेला. 



बहीण ही आईचं रुप असते. ज्याचासोबत लहानचं मोठो झालो त्यालाच असा धोका मिळाला. प्रेम आंधळ असतं पण किती...हा व्हिडीओ चीनमधील आहे असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ ट्वीटरवर @lvmaoshetuite या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.