लग्नाच्या काही तासातच नवरदेवाचं असं कृत्य, थेट पोहोचला तुरुंगात
लग्नाच्या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेनं वाट पाहात असते. तसेच या दिवशी मी सर्वात सुंदर दिसेन अशी देखील तिची भावना असते.
मुंबई : लग्नाच्या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेनं वाट पाहात असते. तसेच या दिवशी मी सर्वात सुंदर दिसेन अशी देखील तिची भावना असते. अनेक गोष्टींचा विचार मनात ठेवून त्या आपल्या लग्नाची वाट पाहाता. परंतु जर त्यांच्या जोडीदारानेच त्यांच्या लग्नाचं स्वप्न मोडलं तर, त्याहून दु:खं ते काही नाही. सध्या असाच एक प्रकार एका लग्नात घडला आहे. ज्यामध्ये अशी बातमी समोर आली आहे की, नवरदेवानं लग्नाच्याच दिवशी असं काही केलं की, ज्यामुळे त्याला तरुंगाची हवा खाण्याची वेळ आली.
खरंतर लग्नाच्या काही तासांनंतर नवरदेवानं वधूवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला लग्नाच्या पार्टीतच अटक केली. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, त्यारात्री लग्नात बरेच लोक दारु प्यायले होते.
खरं तर, एक ब्रिटीश जोडपे स्पेनला सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांनी लग्न करण्याचा बेत आखला. परंतु लग्नाच्या काही तासांनंतर, वराला पार्टीतच राग आला, ज्यामुळे त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता नवविवाहित पत्नीवर हल्ला केला.
'द मिरर'च्या वृत्तानुसार ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली. लग्नानंतर पार्टी सुरू होती. पार्टीत पाहुण्यांना ड्रिंक देण्यात आले. लोक नाचत आणि गात होते. त्यानंतर अचानक कोणत्यातरी कारणावरुन वराला राग आला आणि त्याने वधूला मारहाण केली.
नवरदेवाचं असं हिंसक रुप पाहून लगोच आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना बोलवले.
त्याचवेळी पोलिस येण्यापूर्वीच नववधू तेथून निघून गेली. असे सांगितले जात आहे की, जेव्हा पोलिस लग्नाच्या पार्टीत पोहोचले तेव्हा त्यांनी वराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो शांत होत नव्हता. नंतर पोलिसांनी त्याच्यावर नियंत्रन मिळवलं आणि त्याला पार्टीतून बाहेर काढलं.
खरंतर पोलिसांना नववधूची चौकशी करायची होती. परंतु नववधू तेथून निघून गेली होती. आत्तापर्यंत, अहवालात वधूकडून वराला सोडवण्याचा प्रयत्न केला गेला की नाही हे सांगितलेले नाही.