अमेरिकेतील भारतीयांना आणखी एक धक्का; एच-१बी व्हिसाच्या नियमात होणार `हे` बदल
अर्ज फेटाळल्यास त्या व्यक्तीला देशातून हद्दपार करण्याची कारवाई होऊ शकते.
अमेरिकेतील भारतीय नोकदरांना ट्रम्प प्रशासन दणका देण्याच्या तयारीत आहे. एच-१बी व्हिसाबाबत अमेरिकेत नवे धोरण लागू झाले आहे. या धोरणानुसार एच-१बी व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्याचं नुतनीकरण करणे आवश्यक आहे. नुतनीकरणाचा हा अर्ज फेटाळल्यास संबधित व्यक्तीची रवानगी थेट मायदेशी होण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ,नूतनीकरण किंवा 'चेंज ऑफ स्टेटस'साठी केलेला अर्ज फेटाळल्यास त्या व्यक्तीला देशातून हद्दपार करण्याची कारवाई होऊ शकते.
दरवर्षी अमेरिकेकडून ६५ हजार एच१बी व्हिसा दिले जातात. भारतीय माहिती व तंत्रज्ञान उद्योग त्यातील दहा हजारांपेक्षाही कमी वापरतो. यातील ७० टक्के व्हिसा भारतीय व्यक्तींच्या वाट्याला येतात.