इस्लामाबद : संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केलेला कुख्यात आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद निवडणूक लढवणार आहे. २५ जुलैला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जमातचीच उपसंस्था असलेल्या अल्ला उ अकबर तेहरीक या संस्थेकडून तो निवडणूक लढवत आहे. या संस्थेची अजून राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून हाफीज सईद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे.