Happy Valentine Day 2023 Wishes: व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा संपला असून आज, 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे (Valentine Day 2023) साजरा केला जाईल. यादिवशी प्रेमियुगल एकमेकांजवळ आपले प्रेम व्यक्त करतात. केवळ कपलच नव्हे तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील केवळ आनंद, मौज म्हणून व्हेलेंटाईन डे साजरा करतात. जर तुम्हाला आपले प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्याच्यासाठीही व्हॅलेंटाइन डे ही एक उत्तम संधी असू शकते. हा दिवस खास बनवण्यासाठी, लव्ह बर्ड्स एकमेकांना केवळ त्यांच्या भावनाच व्यक्त करत नाहीत तर भेटवस्तू देऊन आणि सुंदर संदेश पाठवून त्यांचे प्रेम देखील व्यक्त करतात. प्रेम आणि नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी आज तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीला  खास संदेश, कवितांसह व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्या. (Happy Valentine Day 2023 Wishes in Marathi)


व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी येते तुझी आठवण,
राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
अशीच साथ देऊया एकमेकांना आपण
हॅपी व्हॅलेंटाइन डे"


"शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम.."
Happy Valentine Day


वाचा: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी कोणाला होकार मिळणार? पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा 


"मला तुझंच बनून कायमचं राहायचंय,
हट्ट मााझे पुरवून घ्यायचेय,
मला हवं ते देशील ना ?
सांग मला स्विकारशील ना?
आपले सुंदर हे नाते निभावशील ना?
हॅपी व्हॅलेंटाइन डे"


"तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
हॅपी व्हॅलेंटाइन डे...



"ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात"
Happy Valentine Day


"प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला
क्षणभरासाठी माझ्या समोर ये
पळभराची ती साथ अशी काही असो
की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
हॅपी व्हॅलेंटाइन डे "