लष्करी राजवटीनंतर राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना अटक
झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं हातात घेतली आहेत.
हरारे : झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं हातात घेतली आहेत. लष्करी राजवटीनंतर राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना अटक करण्यात आली आहे.
रॉबर्ट मुगाबे यांना अटक
देशाचे उपराष्ट्रपती इमरसन मनंगावा यांच्या बरखास्तीनंतर लष्करप्रमुख राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना आव्हान दिलं होतं. मुगाबेंच्या झेडएएनयू पीएल पक्षाने लष्करप्रमुख कान्सटॅनटिनो चिवेंगा यांच्यावर मंगळवारी देशद्रोहाचा आरोप केला.
आरोपांमुळे राष्ट्रपतींसमोर मोठा पेच
झिम्बाब्वेमधील परिस्थिती आधीपासूनच बिकट असताना, सत्तारुढ पक्षाच्या आरोपांमुळे राष्ट्रपतींसमोर मोठा पेच निर्माण झाला. राष्ट्रपती मुगाबे यांनी उपराष्ट्रपती एमरसन यांची बरखास्ती मागे घ्यावी, अशी चिवेंगा यांनी मागणी केली. पण सत्तारुढ पक्ष झेडएएनयू-पीएलने चिवेंगा यांची ही भूमिका देशद्रोही असल्याचं म्हटलं.
देशातील जनतेला चिथावणीचा आरोप
तसेच त्यांचा उद्देश देशातील जनतेला चिथावणी देण्याचा असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, उपराष्ट्रपती मनांगाग्वा यांच्या बरखास्तीपाठीमागे मनांगाग्वा आणि राष्ट्रपती मुनाबे यांची पत्नी ग्रेस यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
ग्रेस यांच्या नावाची जोरदार चर्चा
झिम्बाब्वेच्या पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ग्रेस यांच्या नावाची सत्तारुढ पक्षाकडून जोरदार चर्चा आहे. पण त्यांना मनांगाग्वा यांचं कडव आव्हान असल्याचं बोललं जात आहे.