Harry and Meghan Netfilx Documentary: राजघराण्यात सर्वच गोष्टी चांगल्या प्रकारे घडत असतात असं आपल्याला वाटतं असतं परंतु हे पुर्ण सत्य नाही असं प्रिन्स हॅरीच्या (prince harry) वक्तव्यावरून कळतं आहे. मागच्याच वर्षी राजघराण्यापासून दूर जात आपलं कुटुंबिक आयुष्यात (royal family) खाजगी पद्धतीनं आता यापुढे जगणार असल्याचं  मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांनी स्पष्ट केले होते. द ऑपेरा विन्फ्री (opera winfrey) शोमधूनही प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल (meghan markle) या दोघांनी राजघराण्यात होणाऱ्या आपल्या त्रासाबद्दल नमूद केले होते त्यानंतर सगळ्यांचे लक्ष हे त्यांच्याकडे वधले होते. आपल्या आईसोबत जे झालं ते आपल्या बायकोसोबत होऊ नये अशी इच्छा प्रिन्स हॅरीनं व्यक्त केली होती. तेव्हा त्याच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं होत. (harry and meghan documentary trailer releases stunts the audience meghan markle and prince harry marriage and secrets)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर राजघराण्यावर अनेक आरोपही प्रिन्स हॅरी यांनी केले होते. यामध्ये राजघराण्यात वर्णद्वेष असल्याचा आरोप प्रिन्स हॅरीनं केला होता. त्यावर राजघराण्यातून वर्णद्वेष केला जात नसल्याचं स्पष्टीकरणही प्रिन्स विल्यम यांनी केलं होतं. परंतु सध्या प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल हे पुन्हा चर्चेत आले आहेत. राजघराण्यातील जळजळीत वास्तव आता लोकांपुढे येणार आहे, हॅरी आणि मेगन नावाची डॉक्यूमेंटरी नेटफ्लिक्सवर (netfilx documentary) पदर्शित होणार आहे. 


यामध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल अनेक धक्कादायक दावे केल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरून कळते आहे. या डॉक्यूमेंटरीचा एक लहानसा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या या ट्रेलरनं सगळीकडे एकच खळबळ माजवून दिली आहे. अशा प्रकारे राजघराण्यावर (royal family) भाष्य करणारी ही डॉक्यूमेंटरी दोन भागांची आहे. 


सध्या या डॉक्यूमेंटरीतून अनेक गुपित समोर येण्यासाठी शक्यता आहे. ही डॉक्यूमेंटरी (top documentaries to see in 2023) दोन भागात 8 डिसेंबर आणि 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या भागांमध्ये हॅरी आणि मेगननं आपल्याला लग्नानंतर सामोरं जायला लागणाऱ्या अडचणींमध्ये भाष्य केले आहे. समोर आलेल्या ट्रेलरमधून इट्स 'अ डर्टी गेम' (dirty game) अशा प्रकारचं वक्तव्य प्रिन्स हॅरी करताना दिसत आहे. त्यातून मेगनही अश्रु पुसताना दिसते आहे. तसेच प्रिन्स हॅरी देखील आपल्या कटू अनुभवांबद्दल सांगताना गंभीर होताना दिसत आहे. आपण राजघराण्यातील असल्यामुळे आपल्यामागे कायम कॅमेरे लागलेले असतात. आणि त्यामुळे त्यांना आपलं खाजगी आयुष्यही व्यवस्थित व्यतित करता येत नाही तसेच राजघराण्यातील अनेकांच्या वैयक्तिक गोष्टी बाहेर सार्वजनिक केल्या जातात असाही आरोप प्रिन्स हॅरी यांनी केला होता. 



या ट्रेलरमधून प्रिन्सेस डायना (princess diana) यांची झलकही पाहायला मिळते आहे. प्रिन्सेस डायना यांनीही मृत्यूपुर्वी अनेक गौप्यस्फोट केले होते. आपल्या राजघराण्यातील त्रासाबद्दल, आपल्या प्रिन्स चार्लस यांच्याविषयीच्या नात्याबद्दल, तसेच फोटोग्राफर्सनी केलेल्या नाहक छळाबद्दल सांगितले होते. त्याचीच पुनरावृत्ती प्रिन्स हॅरीसोबत (princess diana son prince harry) आणि त्याच्या पत्नीसोबत होत असल्याचा दावा त्यांनी दर्शवला आहे.