अंकारा : तुर्कीची राजधानी अंकारामध्ये जलप्रकोप पाहायला मिळाला. इथल्या एका भागात अचानक आलेल्या पूरामुळे सारं काही क्षणात उद्धवस्त झालं. अंकारात अतिवृष्टीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झालीय. ही दृष्यं तुम्ही कधीही पाहिली नसतील. रस्त्यावर जागोजागी पाणी साचलं. ही परिस्थिती इतकी गंभीर होती की रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झालं. पूराच्या पाण्यात सारं काही वाहून गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक आलेल्या या जलप्रकोपामुळे शहरातल्या रस्त्यांवर उभी असलेली वाहनं, आजूबाजूची दुकाने आणि घरं वाहून गेली. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी वाहणाऱ्या गाड्यांच्या बोनेट आणि टपाचा आधार घेतला. पूराची ही भीषणता पाहून कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.


पाहा व्हिडिओ