पॅरीस : तब्बल १६ वर्षं जर्मनीचं चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८२ ते १९९८ या दरम्यान त्यांनी जर्मनीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती. जर्मनीच्या एकीकरणात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कारकिर्दीत जर्मनीनं उल्लेखनीय प्रगती साधली होती. युरोपीय महासंघामध्येही हेलमट कोल यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं होतं. 


त्यांनी पूर्व आणि पश्चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानंही संबोधलं जातं. तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.


जर्मनीचं एकत्रीकरण केल्यानंतर१९९० ते १९९८ या च्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेत्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिश्चियन डेमोक्रेटिक युनियन पार्टीचे नेते हेलमुट कोल यांनी १६ वर्षं जर्मनी या देशाचे चान्सेलर पद सांभाळलं. जर्मनीचे निर्माता बिस्मार्कनंतरचे सर्वात मोठे नेते म्हणून हेलमुट कोल ओळखले जातात.