लंडन : ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या गुहांमुळे(लावा ट्यूब्स) चंद्र आणि मंगळ ग्रहावर मनुष्यांना राहण्यासाठी योग्य स्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. वैज्ञानिकांनुसार, चंद्र आणि मंगळ ग्रहावर लपलेल्या लावा ट्यूब्समुळे मनुष्यांना सुरक्षित निवारा मिळू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकेच काय तर यात शहरंही वसवले जाऊ शकतात. हवाई, आइसलॅंड, ऑस्ट्रेलियात उत्तर क्वींसलॅंड, सिसली आणि गलापागोस द्विपांसहीत पृथ्वींवर ज्वालामुखी क्षेत्रांमध्ये लावा ट्यूब्स आढळल्या आहेत. या ट्यूब्सचं भूमिगत नेटवर्क हे ६५ किलोमीटरपर्यंत असू शकतं. 


अंतराळात करण्यात आलेल्या अभियानांमधून चंद्र आणि मंगळ ग्रहावर खड्डे दिसले आहेत. त्यातून तिथे लावा ट्यूब्स असल्याचे पुरावे मिळतात. इटलीमधील पडोवा विश्वविद्यालय आणि बोलोग्ना विश्वविद्यालयातील संशोधकांनी पृथ्वी, चंद्र आणि मंगळ ग्रहावर असलेल्या लावा ट्यूब्सचा तुलनात्मक अभ्यास केला. पडोवा विश्वविद्यालयाचे रिकार्डो पोजोबन म्हणाले की, ‘पृथ्वी, चंद्र आणि मंगळ ग्रहाच्या तुलनेतून माहिती मिळते की, गुरूत्वाकर्षणाचा लावा ट्यूब्सच्या आकारावर प्रभाव पडतो. पृथ्वीवर या ३० मीटरपर्यंत असू शकतात. मंगळावरील कमी गुरूत्वाकर्षण असलेल्या वातावरणात आम्ही २५० मीटरपर्यंत रूंद लावा ट्यूब्स असल्याचे पुरावे पाहिले आहेत’.


पोजोबेन म्हणाले की, ‘चंद्रावर या गुहा एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा शेकडो किलोमीटरपर्यंत पसरलेल्या असू शकतात. शोधातील निष्कर्श चंद्रावर राहण्याच्या शक्यतांसाठी आणि मानव जीवनासाठी महत्वपूर्ण आहेत. लावा ट्यूब्स कॉस्मिक किरणे आणि परग्रही कणांपासून सुरक्षा प्रदान करते, त्यामुळे अशी शक्यता आहे की, भविष्यात मनुष्याला सुरक्षित जागा उपलब्ध होऊ शकते. पोजोबेन म्हणाले की, लावा ट्यूब्स मानवी वस्ती वसवण्यासाठी ब-याच मोठ्या असतात.