नवी दिल्ली : पाकिस्‍तानात 25 जुलैला निवडणुका होणार आहेत. याआधी पाकिस्तानात मतदारांची माहिती समोर आली आहे. हे आकडे पाहिले तर लक्षात येईल की, पाकिस्‍तानात मुस्लीम सोडून इतर धर्माच्या लोकांची संख्या वाढली आहे. यंदा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यकांच्या संख्येमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक मतदारांची संख्या 27 लाख 70 हजार होती. यंदा ही संख्या 36 लाख 30 हजार झाली आहे. यामध्ये 17 लाख 70 हजार हिंदू मतदारांची संख्या आहे. हिंदूंची संख्या 3 लाख 70 हजारांनी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाक मीडिया रिपोर्टनुसार, अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. 2013 निवडणुकीच्या वेळी हिंदू मतदारांची संख्या 14 लाख होती. तर एकूण अल्पसंख्यकांची संख्या 27 लाख 70 हजार इतकी होती. आता हिंदू मतदारांची संख्या 17 लाख 70 हजार झाली आहे. सर्वात अधिक हिंदू मतदार सिंध प्रांतात आहे. जेथे 2 जिल्ह्यांमध्ये एकूण मतदारांपैकी 40 टक्के मतदार हिंदू आहेत. 


पाकिस्तानात ख्रिश्चन लोकांची संख्या दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानमध्ये यंदा 16 लाख 40 हजार ख्रिश्चन मतदार आहेत. ज्यामध्ये 10 लाख ख्रिश्चन पंजाब प्रांतात राहतात. तर 2 लाख सिंध प्रांतात राहतात. 2013 च्या निवडणुकीमध्ये हिंदुंच्या तुलनेत ख्रिश्चन मतदारांची संख्या देखील वाढली आहे. पारसी मतदारांची संख्या देखील 2013 मध्ये 3 हजार 650 होती ती आता 4 हजार 235 झाली आहे. येथे बौद्ध मतदारांची संख्या 1 हजार 452 हून 1 हजार 884 झाली आहे.