HIV AIDS Treatment: एचआयव्ही एड्स या रोगाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. त्यासोबत हा रोग अत्यंत घातक असल्यामुळे त्यावर अद्यापही उपाय काय? असाही प्रश्न वैद्यकीय शास्त्रात डॉक्टर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु एचआयव्ही एड्स (HIV AIDS) या रोगावर या देशात एक रामबाण उपाय सापडला आहे. फ्रान्स देशातील पाश्चर इंस्टिट्यूटच्या (Pasteur Institute) डॉक्टरांचा असा दावा आहे की, बोन मॅरो स्टेम सेल ट्रान्सप्लांटमधून एचआयव्ही एड्सच्या पेशंटला पुर्णपणे बरा करण्यात यश आलं आहे. एचआयव्हीसाठी 2018 पासून एन्टी रेट्रोवाइरल थेरेपी दिली जाते ती बंद करण्यात आली आहे. या थेरेपीमध्ये चार वर्षापर्यंत एचआयव्ही पेशंट्सची काळजी घेतली जाते. एचआयव्ही ए़ड्स (HIV AIDS Treatment) होऊ नये म्हणून योग्य ती काळजीही डॉक्टरांकडून घेतली जाते त्याचबरोबर ही थेरेपी बंद केल्यानंतर डॉक्टरांनी या आजारावरील थेरेपीसाठी अनेक प्रयोग केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोन मॅरो हे आपल्या हाडांमध्ये असते आणि त्यात स्टेम सेल नावाचा एक पदार्थ असतो ज्याचा वापर या रोगाचा फैलाव शरीरात होण्यापासून रोखला जातो. यातून थैलासीमिया, सिकल सेल एनीमिया, ल्यूकेमिया सारखे रोग हे बरे झाले आहेत. 


प्रयोग, प्रयत्न आणि यश? 


ज्या रूग्णावर हा प्रयोग डॉक्टरांनी केला आहे त्याला 2008 पासून एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर 3 वर्षांनी त्याला रक्ताचा कर्करोग म्हणजेच एक्यूट माइलॉयड ल्यूकेमिया हा आजार असल्याचेही उघड झाले. 2013 साली म्हणजेच दहा वर्षांपुर्वी त्यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये असलेल्या CCR5 म्यूटेशन जीनमुळे (Mutation Genes) एचआयव्ही एड्स शरीरात पसरण्यापासून थांबवता आला. असे यश पाश्चर इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांना मिळाले आहे. 


बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे स्टेल सेल ट्रान्सप्लांट कधी सुरू झाले? 


2007 मध्ये टिमोथी रे ब्राऊन या व्यक्तीच्या उपचारासाठी पहिल्यांदा या ट्रान्सप्लांटचा उपयोग करण्यात आला होता. यासाठी एका व्यक्तीच्या शरीरातील बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट (Bone Marrow) करावे लागते. ज्यातून एचआयव्ही ए़ड्सचा उपचार करण्यात यश आले आहे.


डॉनर किती निरोगी असायला हवा? 


प्रथम तुम्हाला जर का हे ट्रान्सप्लांट करायचे असेल तर तुमचा सेल हा त्या डॉनरशी मिळता जुळता हवा त्यातून त्यात ह्यूमन ल्यूकोसाईट एंटीजन (HLA) शी मॅच होणं गरजेचं आहे. त्यातून त्या व्यक्तीच्या शरीरात ही असं आवश्यक राहते ज्यानं इम्यून सिस्टम कंट्रोल होते. याचे प्रमाण हे 25 टक्के असणंही आवश्यक आहे. भावांमध्ये 25 तर आईवडिलांमध्ये 1-3 टक्के असायला हवे. आटोलोगस आणि एलोजेनिक अशा दोन प्रक्रियांतून ही थेरेपी केली जाते.