मुंबई : ब्रिटेनचे प्रिंस हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल या शाही जोडप्याची नुकतीच टीव्हीसाठी मुलाखत घेण्यात आली. जी सध्या जगभरात खूपच चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ब्रिटेनच्या शाही परिवाराबद्दलचे काही स्पष्टीकरण दिलं आहे . ज्यामुळे इंटरनॅशनल मीडियापासून ते ब्रिटेन-अमेरिकेतील राजकारणी लोक सगळेच याबद्दल चर्चा करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलाखत अजून एका कारणामुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे, सीबीएसने चॅनलने ही मुलाखत घेण्यासाठी होस्टला किमान 51 कोटी रुपये दिले. हे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नुसार समोर आले.



हॅरी आणि मेगन हे एका राज घराण्यातील जोडपं आहे, त्यामुळे प्रसारण मुलाखतींसाठी अधिकार खरेदी करण्यासाठी सीबीएस चॅनलने प्रसिद्ध होस्ट ओपरा विनफ्री यांना 51 कोटी ते 65 कोटी रुपये दिले, अशी माहिती समोर आली आहे. हॅरी आणि मेगन यांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचे मानधन दिलेलं नाही.


ओपरा विनफ्री ह्या 67 वर्षाच्या टॉक शो होस्ट, टीव्ही प्रॉड्यूसर, अभिनेत्री, लेखिका अशा विविध कामांसाठी ओळखल्या जातात. फोर्ब्स magazine च्या अहवालनुसार ओपरा विनफ्री या 19 हजार 700 कोटी रुपयांच्या मालकीण आहेत, त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आहे. त्यांच्या आयुष्याची सुरवात त्यांनी खूप कठीण परिस्थितीतून केली.



ओपरा विनफ्री यांनी,  हॅरी आणि मेगन सोबत होस्ट केलेला Interview रविवारी रात्री 8 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) सीबीएस चॅनलवर दाखवला गेला.


हार्वर्ड बिझिनेस स्कूलच्या इतिहासकार 'नॅन्सी कोएनच्या' म्हणण्यानुसार, ओपरा विनफ्री हा Interview इतर कोणत्याही टीव्ही चॅनलला किंवा स्ट्रीमिंग सर्विसेसला देऊ शकल्या असत्या. परंतु सीबीएसचे प्रेक्षक अधिक असल्याकारणाने आणि चॅनलची प्रतिष्ठा पाहून हा Interview सीबीएस चॅनलला दिला.