टोक्यो : विचार करा आतापर्यंत चहूबाजूंनी ग्लास असलेल्या भिंती किंवा रूम या सिनेमा किंवा सीरियल्समध्ये पाहिल्या असतील. अशा रूम फार कमी ठिकाणी दिसतात. जर आपल्याला अशा रूममध्ये राहाण्याची वेळ आली तर? जगभरात कोरोनाचा धोका वेगानं वाढतोय. याच काचेच्या रूमची आयडिया डोक्यात ठेवून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नामी युक्ती वापरण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही आयडीया पाहून तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? हे तर स्वप्न नाही? पण नाही असं एक हॉटेल आहे जिथे अलिशान अशी सोय करण्यात आली आहे. तिथे तुम्हाला काचेच्या केबिनमधून बसून खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक सोयीचं होईल. 


साधारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे मास्क काढून ठेवला जातो. समोरासमोर जर ग्राहक असतील तर संसर्ग होण्याचा धोका असतो. आता फोटो पाहून असा प्रश्न पडेल की हे ग्राहक असे बसून का जेवत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट युक्ती शोधून काढण्यात आली. 


कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जपानची राजधानी टोकियोमधील एका हॉटेलने एक अनोखा मार्ग काढला. या हॉटेलने विशेष गोल काचेच्या टाक्या डिझाइन केले. ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होण्यासाठी मदत झाली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये हॉटेलची ही सर्जनशीलता चांगलीच पसंत केली. जपानचे लोक आता त्यांच्या मित्र आणि कुटुंबासोबत बाहेर खाण्याचा आनंद घेऊ शकतात आणि तेही कोणत्याही धोक्याशिवाय.


Reuters ने दिलेल्या वृत्तानुसार होशिनोया टोक्यो इथे ही सुविधा सुरू केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लंबगोलाकार काचेच्या टाक्या लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जाऊन बसायचं आणि आपली ऑर्डर आली की खाऊन बिल देऊन जायचं. या बॉक्सचा आकार पारंपरिक पद्धतीनं तयार करण्यात आला आहे. 


या हॉटेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला 30 हजार येन म्हणजेच 19 हजार रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय इथे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही जेवणाचं आमंत्रण देऊ शकता. जपानमध्ये मोठ्या प्रमाणत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना हॉटेलनं शोधलेला हा नवा पर्याय खूपचं कौतुकास्पद आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.