Hairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा
Hairfall Problem : तुम्हालाही आहे केस गळतीची समस्या... आणि त्यात तुम्हीही केस धुताना वापरतात थंड पाणी मग लगेच वाचा ही बातमी... फक्त गरम नाही तर थंड पाण्यानं केस धुतल्यानं होऊ शकतात या समस्या इतकंच काय तर केस गळतीची समस्या वाढण्याची आहे शक्यता...
Hairfall Problem : स्त्रिया असो वा पुरुष दोघांनाही त्यांचे केस फार प्रिय असतात. केसांमुळे आपला लूप हा संपूर्ण बदलतो. तुम्हाला विश्वास होत नसेल तर अनेकवेळा तुम्ही पाहिलं असेल की वेगळा हेअर कट किंवा वेगळी हेअर स्टाईल केली तरी आपला लूक बदलतो. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. पण केसांची काळजी घेताना अनेकांचा गोंधळ उडतो तो म्हणजे केस धुताना कसं पाणी घ्यावं थंड की गरम? काही लोक म्हणतात की थंड पाण्यानं केस धुवा तर काही म्हणतात गरम पाण्यानं धुवा. त्यातही थंड पाण्यानं केस धुतले किंवा गरम पाण्यानं केस धुतले की केस गळतात यावर अनेकदा लोकांमध्ये वाद होत असल्याचे आपण पाहतो. अशात योग्य काय आहे हे जाणून घेऊया...
गरम पाणी
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गरम पाण्याने केस धुतल्याने तुमच्या केसांचा क्युटिकल्सवर परिणाम होतो. क्यूटिकल हा केसांच्या बाहेरील भागाचा थर असतो, जो केसांचे संरक्षण करण्यासोबतच त्यांची मजबूती ठेवण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही तुमचे केस गरम पाण्याने धुता तेव्हा पाण्याच्या तापमानाचा तुमच्या क्युटिकल्सवर परिणाम होतो. गरम पाण्यामुळे क्युटिकल्स उघडतात केस ड्राय होऊन ते कमकुमत होऊन केस गळू शकतात. तर गरम पाण्यानं केस धुतल्यानं आपल्या त्वचेला ऑक्सिजन मिळतं आणि केस वाढण्यासाठी ज्या प्रकारे ब्लड सर्क्युलेशनची गरज असते ते होतं.
हेही वाचा : सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो
थंड पाणी
थंड पाण्याने केस धुतल्याने क्युटिकल्स बंद होतात. हे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करते. थंड पाण्याचा वापर केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते. जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेत असाल आणि ते निरोगी आणि चमकदार ठेवू इच्छित असाल तर गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने केस धुतल्याने तुमचे केस चांगले आणि शायनी दिसतात आणि तुमच्या केसांच्या आरोग्यालाही फायदा होतो. तर थंड पाण्यानं केस धुतल्यानं तुमच्या केसांचा व्हॉल्युम कमी होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढण्याची शक्यता असते.
इतकंच नाही तर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला इतर गोष्टी देखील कराव्या लागतात आणि त्या म्हणजे....
योग्य शॅम्पू निवडा: तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा जे तुमच्या केसांची नैसर्गिकता आणि ते मध्येच तुटणार नाहीत याची काळजी घेता येईल. तुमच्या केसांची कन्डिशन आणि त्वचेच्या प्रकारानुसार योग्य शॅम्पू निवडा.
कंडिशनर वापरा : चांगलं कंडिशनर वापरल्याने तुमचे केस मऊ राहतील. याशिवाय कंडिशनर केसांना ताजेपणा आणि चमक आणण्यास देखील मदत करते.
केस धुण्याची पद्धत: केस धुताना भरपूर शॅम्यू आणि कंडिशनरने धुण्याऐवजी हलक्या हातांनी मसाज करून धुवा. यामुळे केस चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होईल.
केसांना मसाज करा: केसांना नियमितपणे मसाज केल्याने ते निरोगी आणि मजबूत होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)