याला म्हणतात जंगलांचं Bermuda Triangle; इथे एकदा गेलेला व्यक्ती...!
आज आम्ही तुम्हाला अशाच एका जंगलाविषयी सांगणार आहोत, ज्याला जंगलांचा बरमुडा ट्रँगल म्हटलं जातं
रोमानिया : पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जी एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाहीत, ही ठिकाणं रहस्यमयी मानली जातात. कारण या ठिकाणी अशा काही घटना घडतात ज्या सहसा कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे ही ठिकाणं रहस्यमय असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो.
बर्म्युडा ट्रँगलबद्दल तुम्ही यापूर्वी ऐकलंच असेल. समुद्राच्या मधोमध अशी कोणती जागा आहे, ज्यावरून जाणारं विमान अचानक नाहीसं होतं. यावरून जाताना अनेक विमाने गायब झाली आहेत, ज्यांचा आजपर्यंत शोध लागलेला नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका जंगलाविषयी सांगणार आहोत, ज्याला जंगलांचा बरमुडा ट्रँगल म्हटलं जातं, कारण या जंगलात गेल्यावर कोणीही परत येत नाही.
रोमानियामध्ये आहे हे जंगल
रोमानियाच्या ट्रान्सल्व्हानिया प्रांतामध्ये अशा घटना घडतात. ज्याठिकाणी अशा विचित्र घटना घडतात की, लोक आता याठिकाणी जाण्यासाठी घाबरतात.
मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी 'होया बस्यू' नावाचं जंगल आहे. जे जगातील सर्वात भयंकर जंगलांपैकी एक मानलं जातं. याठिकाणी घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे या ठिकाणाला 'बर्मुडा ट्रँगल ऑफ रोमानिया किंवा ट्रान्सिल्व्हेनिया' असं म्हणतात.
700 एकरांवर पसरलंय हे भितीदायक जंगल
हे जंगल क्लुज-नापोका शहराच्या पश्चिमेला असलेल्या क्लुज काउंटीमध्ये आहे. हे जंगल 700 एकरमध्ये पसरलं असून त्याठिकाणी शेकडो लोकं बेपत्ता झाल्याचं समजतं. या जंगलातील झाडं वळणदार आणि वाकडी आहेत, जी दिवसा उजाडतानाही खूप भीतीदायक दिसतात. लोक या ठिकाणाचा संबंध UFO आणि भूतांशी देखील जोडतात.
पहिल्यांदा गायब मेंढपाळ
या भागात एक मेंढपाळ बेपत्ता झाल्यावर 'होया बस्यू' जंगलाबद्दल लोकांची उत्सुकता प्रथम वाढली. जुन्या कथेनुसार, तो माणूस जंगलात प्रवेश करताच रहस्यमयपणे गायब झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्याच्यासोबत 200 मेंढ्याही होत्या.
असंही सांगितलं जातं की, काही लोक या ठिकाणी फिरण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु ते काही काळ गायब झाले आणि काही वेळाने पुन्हा आले. या जंगलात गूढ शक्तींचा वास्तव्य असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. इथे लोकांना विचित्र आवाजही ऐकू येतात. यामुळेच या जंगलात लोकांना पायही ठेवत नाही.