मुंबई : पृथ्वीवर एक मोठा लघुग्रह येण्याचा धोका टळला आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार होता. मात्र, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ३१ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याने मोठा धोका टाळला आहे. लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. कारण हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे दहा वर्षानंतर, १३ एप्रिल २०२९, या दिवशी ‘अपोफिस’ नावाचा ३४० मीटर आकाराचा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती. परंतु हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ३१ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड बिनझेल यांनी सांगितले.


‘अपोफिस’ विषयी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले, ‘अपोफिस’ हा लघुग्रह तीन शास्त्रज्ञांनी १९ जून २००४ रोजी अमेरिकेतील किटपीक वेधशाळेतून शोधला होता. अधिक चैत्र कृष्ण अमावास्या, शुक्रवार १३ एप्रिल २०२९ हा दिवस त्यादृष्टीने मोठय़ा ‘धोक्याचा दिवस’ समजला जात होता. कारण हा मोठा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र, हा धोका टळला आहे.