डिसेंबरच्या मध्यावर एक मोठी उल्का पृथ्वीकडे झेपावतेय
एक मोठी उल्का या महिन्याच्या मध्यावर पृथ्वीच्या जवळून झेपावणार असल्याची बातमी फॉक्स ३२ न्यूजने दिली आहे.
न्यू यॉर्क : एक मोठी उल्का या महिन्याच्या मध्यावर पृथ्वीच्या जवळून झेपावणार असल्याची बातमी फॉक्स ३२ न्यूजने दिली आहे.
कधी जाणार पृथ्वीजवळून...
या उल्केला ३२ फाथॉन असे नाव देण्यात आले आहे. ख्रिसमसच्या एक आठवड्यापूर्वी पृथ्वीपासून ६.२ दशलक्ष मैलावरून ही उल्का येणार असून पृथ्वीच्या कक्षेतून २ दक्षलक्ष मैल जवळून जाणार आहे.
नवा पाहुणा नाही...
ही उल्का पहिल्यांदा पृथ्वीजवळून जात नाही तर दर सहा महिन्यांनंतर पृथ्वीजवळून जात असते.
मोठी उल्का...
फाथॉन ही खूप मोठी उल्का आहे. ६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या उल्केपेक्षा निम्म्या आकाराची ही उल्का आहे. त्या उल्केमुळे डायनासोरचा अंत झाला होता. एका मोठ्या टेलीस्कोपद्वारे ही पाहता येणार आहे.
नभांगणात उद्भूत सोहळा
याच दरम्यान फाथॉन येण्यापूर्वी उल्का वर्षाव होणार आहे. त्यामुळे आकाशात एक अद्भूत सोहळा पाहायला मिळणार आहे. साधारण १३ आणि १४ डिसेंबरला उल्का वर्षाव होणार असून फाथॉन १७ डिसेंबरला पृथ्वीजवळून जाणार आहे.