मुंबई : एक एव्हरग्रीन नावाचे जहाज गेल्या तीन दिवसांपासून इजिप्तच्या सुएझ कालव्यात  (Suez Canal) अडकले आहे. त्यामुळे जगभरातील जहाजांच्या व्यापारी मार्गामध्ये अडचणी आल्या आहेत. या विशालकाय जहाजाला काढण्यासाठी चक्क छोट्या जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. ज्याचा फोटो सोशलमीडियावर व्हायरल होताच, युजर्सने त्याचे मनोरंजनात्मक मीम्स बनवणे सुरू केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजाला काढण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला आहे. या  महाकाय जहाजासमोर जेसीबी अगदी लहान आणि खेळण्यासारखे दिसत आहे. त्यामुळे या फोटोची सोशलमीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. 


सोशलमीडियावर या घटनेचा  फोटो व्हायरल झाल्याने युजर्सने तुफान मीम्स बनवले आणि एकाहून एक क्रिएटीव्ह मीम्समुळे युजर्सचे मनोरंजन होत आहे.   



या जहाजाची लांबी 400 मीटर आणि रुंदी 59 मीटर एवढी आहे. त्यामुळे त्याला काढणे कठीण झाले आहे.



सुएझ कालव्यात दरदिवसाला 50 व्यापारी जहाज ये जा करीत असतात. जगातील 12 टक्के कच्चा तेलाची वापतूक याच कालव्यातून होते.


एव्हरग्रीन हे जहाज कालव्यात अडकल्याने अनेक देशांना पेट्रोलिएम पदार्थ पोहचवण्यास उशीर होत आहे. कालव्यात ट्रफिक जॅम झाल्याने काही देशांमधील कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.