Intetesting Facts : मानवी उत्क्रांची पाळंमुळं शोधताना कैक लाख वर्षे मागं जावं लागतं. जिथं अगदी चिंपांझीपासून सुरू झालेला प्रवास आजच्या आधुनिक मानवापर्यंत येऊन थांबला आहे. मानवी उत्क्रांती, या प्रक्रियेतच बहुतांशी गोष्टी स्पष्ट होतात. अर्थात उत्क्रांती म्हणजेच मुळात सततचा विकास. मानवी जीवसृष्टीमध्येही हीच प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून, हे बदल असे आहेत जे भौगोलिक, वातावरणी, शारीरिक आणि इतर गरजांनुसार झालेले असतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोपं उदाहरण घ्यायचं झालं, तर मैदानी भागांमध्ये राहणारी मंडळी जेव्हा पर्वतीय क्षेत्रामध्ये जातात तेव्हा त्यांना तेथील वातावरणाशी मिळतंजुळतं घेण्यासाठी अडचणींचा सामना का करावा लागतो? पर्वतीय क्षेत्रांमध्ये राहणाऱ्यांना मात्र अशी समस्या फारच क्वचित जाणवते, किंवा काहींना जाणवतच नाही. पण, असं का होतं? संशोधकांनी तिबेटमधील मानवी जीवनाचं अध्ययन करत एक रंजक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 


अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार... 


मैदानी क्षेत्रांच्या तुलनेत पर्वतांवर ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचं प्रमाण कमी असतं. ज्यामुळं जेव्हाजेव्हा मैदानी क्षेत्रातील कोणीही पर्वतरांगांमध्ये जातं तेव्हा त्यांना श्वासोच्छवासास त्रास होतो. या प्रक्रियेला हायपॉक्सिया (Hypoxia) असं म्हटलं जातं. मागील 10 हजार वर्षांपासून पर्वतरांगांमध्ये वास्तव्यास असणाऱ्यांच्या शरीरात तेथील भौगोलिक स्थितीमध्ये हवामानानुसार बदल झाले आहेत. 


हेसुद्धा वाचा : 'या' बिल्डींगखाली 4203 कोटींचा सोन्याचा खजिना! गुप्त बंकर्सबद्दल लष्कराचा दावा; जगभरात खळबळ


 


अमेरिकेच्या केस वेस्टर्न विद्यापीठाच्या अँथ्रोपोलॉजिस्ट सिंथिया बील यांच्या निरीक्षणानुसार मागील 10 हजार वर्षांमध्ये पर्वतीय क्षेत्रांतील नागरिकांच्या शरीरात तेथील वातावरणाच्या अनुषंगानं बदल झाले आहेत, त्यांचं शहर आवश्यकतेनुसार विकसित झालं आहे. ही मंडळी ज्या उंचीवर वास्तव्यास असतात तिथं मैदानी क्षेत्रातील नागरिकांना डोकेदुखी, श्वसनास त्रास, कानांवर हवेचा दाब वाढल्याचं जाणवणं अशा अडचणी जाणवू लागतात. पण, स्थानिकांमध्ये मात्र यातील एकही लक्षण दिसत नाही, कारण त्यांच्या शरीरानं येथील वातावरण आत्मसात केलेलं असतं. 


तिबेटच्या नागरिकांच्या शरीरात जनुकीय बदल 


सिंथिया यांच्या मते एकंदर निरीक्षणातून लक्षात येत असलेल्या मुद्द्यानुसार मनुष्य हा एकमेव असा सजीव आहे, जो विविध भौगोलिक स्थितींनुसार स्वत:च्या शरीरात नकळत बदल घडवून आणत असतो. तिबेटच्या नागरिकांच्या शरीरात असेच काही जनुकीय बदल झाले आहेत. जिथं कमी ऑक्सिजनपुरवठ्यातही त्यांच्या शरीरात काम करण्याची क्षमता विकसित झाली आहे. त्यांची श्वासोच्छवास यंत्रणा उत्तम काम करत असून, हृदयही त्यानुसारच कार्यक्षम ठरत आहे. या संपूर्ण प्रक्रियेलाच उत्क्रांती असं म्हणावं लागेल. 


प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार पर्वतीय क्षेत्रांमध्ये जन्मास येणाऱ्या बालकांमध्ये काही जनुकीय बदलांचं निरीक्षण करण्यात आलं आहे. विचित्र हवामान स्थितीमध्येही तग धरण्याची क्षमता या बालकांमध्ये निर्माण झाली आहे हेच या अहवालातून सिद्ध होत असून, आता मानवी उत्क्रांतीचा एक नवा टप्पा पाहायला मिळत असल्याचं स्पष्ट झालं.