Human Faces Sculpted On Stone : आपल्या पृथ्वीवर अनेक भौगोलिक आणि वैज्ञानिक घटना या घडत असतात. त्या इतक्या अद्भूत असतात की त्यामागील शास्त्रीय कारण शोधणं हेही तितकेच रंजक होऊन जाते. त्यामुळे अशावेळी आपल्यासमोरही अनेक रहस्य ही उलगडली जातात. सध्या अशीच एक घटना पाहायला मिळते आहे. या घटनेमुळे सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तुम्हाला माहितीये का की चक्क जमिनीवर रहस्यमयी असे मानवी आकाराचे चेहरे पाहायला मिळत आहेत. नक्की हे चेहरे जमिनीवर उमटले तरी कसे? अशा सवाल तुम्हाआम्हाला येणं अगदी साहजिकच आहे. परंतु यातून एक वेगळीच माहिती समोर आली आहे. तेव्हा चला तर मग पाहुया यावेळी नेमकं काय घडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना आहे ती म्हणजे 2000 वर्षे जुन्या मानल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या रेनफॉरेस्टमध्ये मानवी चेहऱ्यांचे ठसे उमटले आहेत. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. पाण्याखाली गेलेल्या निग्रो नदीच्या खडकांवर हे ठसे उमटल्याचे दिसून आले आहे. आता इथले पाणी आटले आहे आणि या नदीखालेली खडकांवर हे हे मानवी चेहरे पाहायला मिळत आहेत. येथे दुष्काळाचे सावट आले आहे त्यामुळे येथील खडकांवर हे विचित्र कोरलेले वाटणारे मानवी चेहरे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले आहे. 


असंच काही यापुर्वी 2010 मध्ये ही घटना घडली होती. परंतु एका दिवसांनंतर ते गायब झाले होते. सध्या यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. डेलीस्टारच्या वृत्तानुसार, रियो निग्रो आणि अॅमेझॉनचा जिथे संयोग होतो त्या ब्राझीलच्या मनौसजवळ नदीच्या तळाशी हे प्राचीन चेहऱ्यांचे ठसे सापडले आहेत. 


काय आहे हे नक्की? 


समोर आलेल्या माहितीनुसार हे पेट्रोग्लिक आहेत म्हणजेच कातळशिल्प. आपल्या भारतातही अशी अनेक कातळशिल्प आहेत. ज्याचावर येथील पुरातत्वशास्त्रज्ञ शोधकार्य करत आहेत. रत्नागिरी आणि कोकण पट्ट्यावर ही कातळशिल्पं सापडली आहेत. एन्शिएन्ट ओरिजन्सच्या अहवालानुसार, अलीकडेच ब्राझीलमध्ये नक्षीकाम सापडल्याची ही दुसरी घटना आहे. @archaeiologymag या युझरनं म्हणजेच आर्किओलॉजी मॅगेझीननं X वर पोस्ट केले आहे. यातून त्यांनी ही माहिती दिली आहे आणि काही फोटोही शेअर केले आहेत. 


त्यामुळे हे ठसे नाहीत तर नक्षीकाम आहे. तज्ञांच्या मते हे नक्षीकाम कुऱ्हाडीनं केले असावेत. ज्याचा आकार चौरसाकृती आहे. या आकृत्यांमध्ये आपण नीट पाहू शकता की डोळे आणि तोंड आहे परंतु नाक नाही. याला कॉम्प्लेक्स ग्राफिक आर्ट असं म्हणतात. यात आनंदी आणि दु:खी चेहरेही आहेत. असेही कळते की ही चेहरे शिकारी असावेत. या नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यावर हे नक्षीकाम परत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. 



कुठे आहे निग्रो नदी? काय आहे इतिहास? 


अॅमेझॉन नदीची निग्रो नदी ही एक उपनदी आहे. तिचा उगम हा कोलंबियामध्ये होतो. व्हेनेझुएला आणि नंतर ती ब्राझील येथील अॅमेझॉनमधून वाहते. या नदीचे मुख हे मनौस शहरात आहेत आणि याच शहराच्या तळाशी हे अवशेष सापडले आहे. अगदी मानवी चेहऱ्याच्या हुबेहुब असे हे अवशेष असल्याकारणानं नक्की यामागील तथ्यं आणि कारणं जाणून घेणे हे शास्त्रज्ञांसाठी खूप मोठं आव्हान आहे आणि आपल्यासाठी ते तितकंच रंजकही आहे. फक्त मानवीच चेहरेच नाहीत तर प्राण्यांच्याही चेहऱ्यांचे ठसे यात उमटलेले दिसत आहेत.