जगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच...
Travel Interesting Facts : हे जग इतकं विस्तीर्ण आहे की त्याच्या कानाकोपऱ्यात फिरायचं ठरवलं तर हा जन्मही पुरेसा ठरणार नाही. तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? तुम्हीही नवनवीन ठिकाणांच्या शोधात Google चा आधार घेत नवी माहिती शोधत असता का? मग खाली दिलेले संदर्भ पाहा. कारण, या माहितीच्या माध्यमातून तुम्ही एका अशा गावाच्या सफरीवर जाणार आहात जे तेथील महिलांच्या सौंदर्यासाठी आणि चिरतारुण्यासाठी ओळखलं जातं.
कुठे आहे हे ठिकाण?
संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा विषय असणारं हे ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये (Pakistan). पाकिस्तानमध्ये असे अनेक प्रांत आहेत जे कायमच कुतूहलाचा विषय ठरले आहेत. यातलंच एक रहस्यमयी ठिकाण म्हणजे हुंजा खोरं. अनेकजण या प्रांतवजा गावाचा उल्लेख पाकिस्तानातील स्वर्ग म्हणूनही करतात. किंबहुना या गावापेक्षा जास्त कुतूहल हे तिथल्या महिलांविषयी असतं. त्यामागचं कारण आहे ते म्हणजे या महिलांचं सौंदर्य. काही ठिकाणी असेही संदर्भ सांगितले जातात की, येथील महिलांचं तारुण्य, त्यांच्या चेहऱ्यावरील लकाकी वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत टिकून असते. इतकंच काय, तर या महिला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गर्भधारणेसाठी सक्षम असतात. (hunza valley women)
कुठे दडलंय हे गाव?
हुंजा खोरं हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचं सांगितलं जातं. दिल्लीवरून या ठिकाणाचं अंतर साधारण 800 किमी आहे. हे ठिकाण संपूर्ण जगासाठी आश्चर्याचा विषय ठरत असून, 2019 मध्ये फोर्ब्स मासिकाकडूनही पर्यटनासाठीच्या Must Visit Places मध्ये या ठिकाणाचा उल्लेख केला होता. हुंजा खोऱ्यातील निसर्ग, इथलं वातावरण या साऱ्यामुळं इथले नागरिक 100 वर्षांचं आयुष्य जगतात.
हेसुद्धा पाहा : अवकाशातील चंद्र भारतात पाहता येतोय; हिमालयाच्या कुशीत दडलंय मोठं रहस्य
ब्लू झोन...
जागतिक स्तरावर हुंजा खोऱ्याची ओळख ब्लू झोन म्हणून आहे. जगात अशी फार कमी ठिकाणं आहेत जिथं सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत इतर नागरिक तुलनेनं जास्त आयुष्य जगतात. हुंजा त्यातलंच एक ठिकाण. इथं राहणाऱ्या स्थानिकांचं राहणीमान इतरांपासून प्रचंड वेगळं आहे. आजारपण इथं कोणाला दूरदूरपर्यंतही स्पर्शून जात नाही. हुंजा खोऱ्यात खाण्यापिण्याच्या सवयींपासून इतर सर्वच गोष्टी जगावेगळ्या असून, येथील नागरिकांच्या शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम होताना दिसतात हे नाकारता येत नाही.