लंडन : मद्यसम्राट आणि किंगफिशर किंग विजय माल्ल्याने मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भारत सोडण्यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना बॅंकप्रकरणी तडजोड करण्याची विनंती केली होती. ही बाब माल्ल्याने वेस्टमिनिटस्टर न्यायालयात नमुद केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माल्ल्या भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून विदेशात पळून गेलाय. त्याच्या दाव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती, असे माल्ल्या याने सांगितले आहे. तडजोडीसाठी मी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती. बँकांनी माझ्या तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यामुळे यावरुन भाजपची डोकेदुखी वाढण्यास मदत होणार आहे.



माल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी लंडन येथील वेस्टमिनिटस्टर न्यायालयात प्रत्यार्पणाबाबत सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी विजय माल्ल्याला मुंबईतील ज्या आर्थर रोड कारागृहात ठेवणार आहेत, त्याचा व्हिडिओ सादर केला.