मास्को: रुसचे वॉचडॉग रोस्पोट्रेबनादजोर यांनी आत्महत्येसंदर्भात किंवा आत्महत्या कशी करावी याबद्दलची माहिती देणाऱ्या वेबसाईटचा शोध घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या पाच वर्षात त्यांनी अशा २३००० वेबसाईट्स शोधून काढल्या. न्यु एजेन्सी सिन्हुआच्या नुसार रोस्पोट्रबनादजोर यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी १ नोव्हेंबर २०१२ मध्ये २५००० वेबसाईट्स शोधल्या आणि त्यापैकी २३,७०० वेबसाईटमध्ये आत्महत्येसंदर्भात किंवा आत्महत्या कशी करावी याबद्दलची माहिती दिली आहे. 


निगराणी संघटनेने सांगितले की, ते लहान व किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे ऑनलाईन स्त्रोत, समूह, संघटना याबद्दल कायदेशीररीत्या कारवाई केली जाईल. रुसीच्या एजेन्सीनुसार रुसमध्ये आत्महत्या हा मोठा सामाजिक मुद्दा आहे. सरकार ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे आत्महत्येचा दर कमी झाला आहे.