वॉशिंग्टन: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनमधील मतभेद तीव्र होताना दिसत आहेत. अमेरिकेकडून नुकताच ह्युस्टनमधील चिनी दुतावास खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे चीनचा पारा चांगलाच चढला होता. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. आज आपण काही पावले उचलली नाही तर चिनी सरकार आपले स्वातंत्र्य हिरावून घेईल. आपण इतक्या वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली नियमाधारित व्यवस्था मोडीत काढेल. त्यामुळे आज आपण त्यांच्यासमोर झुकलो तर उद्या आपल्या मुलांना चीनकडे दयेची भीक मागण्याची वेळ येईल, असे माईक पॉम्पेओ यांनी म्हटले.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन ही मुक्त जगासमोरील सध्याची प्रमुख समस्या आहे. आम्ही एकट्याने या आव्हानाचा सामना करु शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो, जी७, जी २० या सगळ्यांच्या रुपाने असलेली आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी ताकद यासाठी गरजेची असेल. मात्र, या सगळ्यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असणे गरजेचे आहे. कदाचित आता आमच्याप्रमाणे विचार करणाऱ्या लोकशाही देशांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली आल्याचेही माईक पॉम्पेओ यांनी सांगितले. 



तसेच येणाऱ्या काळात अमेरिकेकडून चीनसाठी अविश्वास आणि खातरजमा करण्याचे धोरण अवलंबिले जाईल. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी रशियाच्याबाबतीत खातरजामा केल्यानंतर विश्वास ठेवण्याचे Turst but Verify धोरण वापरल्याची आठवण माईक पॉम्पेओ यांनी करुन दिली.