``मोबाईल सिमकार्ड ब्लॉक होण्यापेक्षा लस घेतलेली परवडेल, लस नाही घेतली तर सिमकार्ड ब्लॉक``
दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्यातील काही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाब : सगळया देशात कोरोनाचा हाहाकार वाढला आहे. ज्यामुळे अनेक नवनवीन कोरोना रुग्ण संख्या समोर येत आहे. सगळ्याच देशात जवळजवळ हीच परिस्थिती आहे. ज्यामुळे आता सगळ्याच देशींनी लसीकरण मोहिमेला सुरवात केली आहे. परंतु काही देशात लोकांच्या मनात लसं घेण्यासाठी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हे लोकं लसीकरण करण्यासाठी पुढे येत नाहीत. पाकिस्तानमध्ये आता अशीच परिस्थिती आहे. येथील लोकं लस घेण्यासाठी केंद्रावर जात नाहीत.
पाकिस्तमध्ये ही कोरोनामुळे दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने एक वेगळाच निर्णय घेतला आहे. यामध्ये जर लोकांनी लस घेतली नाहीत तर, अशा लोकांचा सिम कार्ड बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे आरोग्य मंत्री डॉ यासमीन रशीद (Dr. Yasmin Rashid) यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तान सरकारने लाहोरमध्ये हा निर्णय घेतला आहे. यामागे त्यांचा उद्देश पाकिस्तानच्या नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आहे. खरेतर ही सक्ती पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात केली गेली आहे.
पाकिस्तान पंजाब प्रांतामधील आरोग्यमंत्री म्हणेले की, लसीकरण केल्यामुळे पाकिस्तानमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते, त्यामुळे लोकांनी लसीकरण केले पाहिजे. त्यामुळे पाकिस्तान पंजाब भागातील लोकांचा डेटा जमा करण्यात आला आहे.
त्या डेट्यामध्ये असे समोर आले की, पाकिस्तानच्या या भागात आद्याप हवं तितकं लसीकरण पार पडले नाही. त्यात पाकिस्तानमधील 3 लाख लोकं असे आहेत ज्यांनी फेब्रुवारीत लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु ते दुसरा डोस घेण्यासाठी परत अलेच नाही. हा प्रकार खूप गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याचे लक्षात घेता पाकिस्तानच्या सरकारने सिम कार्ड बंद करण्याचे आजब पाऊल उचलले आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ते आता अशा लोकांची लिस्ट काढत आहेत, ज्यांना कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी तारीख देण्यात आली. परंतु त्यांनी लस घेतलीच नाही.
दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्यातील काही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "लसीकरण केलेल्या काही लोकांना कोरोना झाल्याची शक्यता आहे, ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला असावा, तर काही, लोकांनी भितीमुळे लस घेतली नसावी." त्यामुळे अशा लोकांचा संभ्रम दूर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी व्यक्त केलं.
पाकिस्तानमधील लोकांसाठी ही पहिलीच वेळ नाही जेव्हा, पाकिस्तानी सरकार लोकांना असा अजब धक्का देत आहे. या आधी पाकिस्तानी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचाही पगार कापण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या सरकारने असा निर्णय घेतला होता की, जे सरकारी कर्मचारी लस घेणार नाहीत त्यांची यादी करुन त्यांचा पगार कापण्यात येईल.
पाकिस्तानची संपूर्ण लोकसंख्या 21 कोटी आहे. ज्यामध्ये यापूर्वी 95 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे त्यात 24 लाख लोकांचे संपूर्ण लसीकरण पार पडले आहे.