इस्लामाबाद : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून घातपात सातत्याने घडवून आणण्यात येत असल्याने भारताने पाकिस्तानसोबत होणारी चर्चा रद्द केली. त्यामुळे पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान संतापलेत. भारत अहंकाही आहे, असे म्हणत उलच्या बोंबा मारण्यास सुरुवात केलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने परराष्ट्र मंत्र्यांमधील न्यूयॉर्क येथील नियोजित चर्चा रद्द केल्याने पाकिस्तानला जोरदार झटका बसलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत भारताविरोधात आगपाखड सुरु केली आहे. अहंकारी भारताने आपल्या शांतता चर्चेच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. ही नकारात्मक भावना आहे. हा भारताचा अहंकार आहे, असे इम्रान खान म्हणाले.


भारत-पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी आपण भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र, भारताच्या अहंकार आणि नकारात्मक प्रतिसादामुळे आपण निराश झालो आहे. चर्चा रद्द झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 



मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेलाय. अनेक सामान्य लोकांना आपण मोठ्या पदावर गेलेलं पाहिले आहे. मात्र, त्या पदावर गेल्यावर त्यांच्यात दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे, असे ट्विट करत इम्रान यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.