Horrible Crime : तरुणींवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याच्या धक्कादायक घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, एका माथेफिरुचे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. एका माथेफिरुने समलैंगिक तरुणीची हत्या केल्यानंतर  त्याचा  पार्ट शिजवून खाल्ला आहे.  अत्यंत  किळवाणा असा हा प्रकार आहे. अमेरिकेत ही क्रूर घटना घटना घडली आहे (Horrible Crime). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्क लॅटुन्स्क ( वय 52 वर्षे) असे या माथेफिरु आरोपीचे नाव आहे. अमेरिकेतील मिशिगनमध्ये हा धक्कादायक हत्याकांड घडले आहे.  25 वर्षीय केविन बेकन नावाचा तरुण या माथेफिरुचा शिकार बनला. हे प्रकरण 2019 या वर्षातील आहे. डेलीस्टारने याबाबतचे वृत्त दिले होते. 


केविन बेकन हा समलैंगिक आहे.  मार्क आणि केविन यांची ओळख  समलिंगी पुरुष LGBT समुदायाच्या डेटिंग App वरुन झाले. यानंतर मार्कने केविन याला भेटायला बोलावले. अमेरिकेत ख्रिसमसचा सुरु होता. तरी देखील केविन मार्कला भेटायला गेला. मार्कने केविनला आपल्या घरीच भेटायला बोलवले. ठरल्या प्रमाणे केविन मार्कच्या घरी त्याला भेटायला गेला. घरी गेल्यानंतर मार्कने केवीनवर अत्याचार केला. ऐवढ्यावरच न थांबता मार्कने केवीनची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे केवीनची हत्या केल्यानंतर मार्कने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि ति शिजवून खाल्ला.


केविनच्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, केविन घरी परतलाच नव्हता. यामुळे केविनच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला. कुठेच केविनचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेरीस त्याच्या कुंटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


पोलिसांनी केविनच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. यावेळी ते केवीनच्या घरापासून 20 मैल अंतरावर दाखवले. पोलिस त्या लोकेशनवर दाखल झाले. केविनच्या शेवटच्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना तीन दिवस लागले. पोलिसांना त्याची कार घटनास्थळापासून साडेसात किलोमीटर अंतरावर सापडली. कारमध्ये केविनचा फोन आणि पाकीट सापडले. फोन डिटेल्सच्या मदतीने  पोलिस मार्कच्या घरी पोहचले. घरात त्यांना केविनचा मृतदेह दिसला. पोलिसांनी मार्कला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली. केविनने स्वतःचाच गळा चिरला असे सांगत मार्कने पोलिसांची  दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.  


अखेरीस मार्कने आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. केविनच्या रक्ताने आणि त्याच्या शरीराच्या अवयवांनी मार्कला झाडांना सिंचन करायचे आहे. त्याला रोपांसाठी खत म्हणून रक्त आणि हाडांची गरज होती असे मार्कने पोलिसांना सांगितले. 
मार्क हा एक सायको किलर असून त्याने अनेकांना अशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले होते. अशी माहिती देखील तपासात समोर आली आहे. मिशिगन न्यायालयाने मार्कला पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.