... तर चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ऐवढी असती, धक्कादायक खुलासा
हाँगकाँग संशोधकांकडून धक्कादायक खुलासा
मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग एका मोठ्या संकटात सापडलं आहे. सर्वच देशांमधून कोरोना रुग्णांचा वाढता आकडा समोर येत आहे. तर चीनने त्यांच्या देशातील कोरोना रुग्णांचे खरे आकडे समोर आणले नाहीत अशी चर्चा सध्य सुरू आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मधल्या काळात चीनमध्ये २.३२ लाख कोरोना रुग्ण असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा धक्कादायक खुलासा हाँगकाँग संशोधकांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, 'आमच्या अहवालानुसार चीनमध्ये कोरोना व्हायरस या महामारीच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी महिन्याच्या मधल्या दिवसांपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २.३२ एवढी होती. संशोधकांच्या या टीमने चीनने कोरोना रुग्णांची संख्या मोजण्यासाठी चूकीच्या मार्गाचा अवलंब केला आसल्याचं वक्तव्य केलं आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ७९८ वर पोहोचली होती. तर या धोकादायक व्हायरसने ४ हजार ६३२ जणांचा बळी घेतला होता. दरम्यान चीनवर कोरोना रुग्णांची संख्या लपवल्याचे आरोप देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी चीनवर टीका देखील केली.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसा फैलाव झाला होता. त्यानंतर यूनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे पेंग वू यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी चीन सरकारने वापरलेल्या विविध वर्गीकरण प्रणालींचा आढावा घेतला.
संशोधकांच्या संशोधनात असं समोर आलं की, या महामारीच्या सुरूवातीपासूनच पाचव्या आवृत्तीचा अवलंब केला गेला असता तर २० फेब्रुवारीपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख ३२ हजारांपर्यंत जाऊ शकली असती. विशेष गोष्ट म्हणजे अहवालात असेही सूचित होते की ज्या देशांमध्ये या माहामारीचा सामना करण्यासाठी पुरेसे परीक्षण किट देखील नव्हते. तेव्हा त्यांनी रुग्णांची अचूक संख्या शोधण्यासाठी क्लिनिकल रोगनिदानचं देखील वापर करणं तितकच गरजेचं होत. असा खुलासा हाँगकाँगकडून करण्यात आला आहे.